संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील रामवाडी व भिमवाडी परीसरात मुकंद मामा काळे व छाया मुकंद मामा काळे यांच्या घरापासुन माझे कुंटुब माझी जबाबदारी मोहीमेस प्रारंभ झाला.
कोरोना वाढता संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात ही मोहिम सुरू झाली असून संवत्सर येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.या मोहिमेत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत.याप्रसंगी मुकुंद मामा काळे म्हणाले की,कोरोनाचा यशस्वीपणे प्रतिकार करण्यासाठी लोक सहभाग हा अतिशय महत्वाचा असुन आपल्याला यापुढे अतिशय सतर्कतेने रहाणे गरजेचे असुन यासाठी लोक सहभाग अतिशय महत्वाचा असल्याने सर्वांनी एकजुटीने आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन मुकुंदमामा यांनी केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र संवत्सर कार्यक्षेत्र रामवाडी व भिमवाडी परीसरात आशा सेविका सौ.लंका टुपके व सौ.अनिता नेवरे यांनी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. या प्रसंगी मुकुंद मामा काळे व छाया मुकुंद मामा काळे तसेच आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.