शिरूरच्या मनसैनिकांच्या पाठीवर मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिली काैतुकाची थाप


शिरूरच्या मनसैनिकांच्या पाठीवर मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिली काैतुकाची थाप

शिरुर प्रतिनिधी ( गजानन गावडे )

सध्याच्या कोरोनाच्या काळात नागरीकांना येत असलेल्या वाढीव वीज बीलांसंदर्भात शिरुर शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी शिरूर येथील महावितरण कार्यालयावर केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली असता नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना मिळवुन देण्यासाठी असेच यापुढेही कार्य करून जागे रहा असे म्हणत पाठीवर काैतुकाची थाप साहेबांनी दिल्यामुळे भरावुन जाऊन कामाचे सार्थक झाले असुन मनसैनिक असल्याचा अभिमान वाटत असल्याच्या भावना येथील मनसैनिक व्यक्त करत आहेत. 

     दरम्यान यावेळी मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्या हस्ते अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश केला असून यावेळी मनसे जनहित कक्षाची शिरुर - आंबेगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

यावेळी जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे,शिरुर मनसे शहराध्यक्ष अविनाश घोगरे,तालुका उपाध्यक्ष रविंद्र गुळादे,मनसे जनहित कक्षाचे शिरुर - आंबेगाव नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अविनाश जाधव व संपत दसगुडे उपस्थीत होते.

             सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात नागरीकांना अर्थिक अडचणींचा सामना करत संसाराचा गाडा चालवावा लागत असताना महावितरणकडुन येत असलेली वाढीव बीले कमी करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माहिती सांगताना मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News