थोडंसं मनातलं.... " नशेने डागाळलेली चित्रपट सृष्टी"


थोडंसं मनातलं....  " नशेने डागाळलेली चित्रपट सृष्टी"

नमस्कार मित्रांनो 

आपला भारत विविध रंगानी आणि जाती धर्माने , अनेक बोली भाषा आणि साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक कलाकृतीने नटलेला आहे. त्यातच मराठी हिन्दी चित्रपट सृष्टीत आणि नाट्य क्षेत्रात अनेक कलावंत आपले भविष्य अजमावत आहेत. चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र" हा चित्रपट निर्माण केला आणि तेथुन पुढे भारतीय चित्रपट क्षेत्रात नवनवे प्रयोग होऊ लागले. खरं त्या काळी करमणूकीची साधने फारच कमी होती म्हणूनच शाहीरी जलसे आणि लोकनाट्य आणि नाटक पहायला लोक गर्दी करत होते. पुर्वी चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या भूमिका करण्यासाठी महिला सुद्धा मिळणे कठीण झाले होते. परंतु नंतर चित्रपट क्षेत्रातील झालेले बदल आणि मिळणारा अफाट पैसा हा कलाकारांच्या दुर्दशाकडे जाणारा रस्ता ठरला. हिन्दी मराठी चित्रपट क्षेत्रात जसजसे बदल होत गेले तसतसे बदल कलाकार मंडळी सुद्धा स्वतः मध्ये बदल करू लागली. आणि त्यामुळेच चित्रपट सृष्टी नशेत गुंग झाली. आपण थोडा अगदी सुरवातीचे सिनेमा कसे होते याचा विचार केला तर आपल्याला निश्चितच जाणवते की तो काळ खरच सिनेमाचा सुवर्णकाळ होता. काही नट नट्या यांना दारू पिण्याचे व्यसन होतेच. त्यामुळेच नंतर त्यांचे उतार वयात त्यांचेवर खुप मोठे अर्थिक संकट आले होते. परंतु आता तर चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते आम्ली पदार्थच्या आहारी गेल्याचे दिसून आले आहे. स्वतःची फिगर मेंटेन करण्या साठी अभिनेते आणि अभिनेत्री ड्रग्ज चे सेवन करायला लागले आणि चित्रपट सृष्टीत ड्रग्ज माफियाचे साम्राज्य स्थापन झाले. सध्या तरी चित्रपट सृष्टीला ग्रहण लागलेच आहे. सिनेमा सृष्टीत चालू असणारी जीवघेणी स्पर्धा ही तर फार मोठी डोके दुखी ठरली आहे. जून महिन्यात सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेते सुशांत सिंग रजपूत यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आणि तिथुन पुढे सगळे वातावरण ढवळून निघाले. चित्रपट अभिनेत्री कंगना रानावत यांनी सुशांत सिंग रजपूत च्या आत्महत्या प्रकरणात कंगनानाने उडी घेतली आणि सगळे खडबडून जागे झाले. तिचे म्हणणे आहे की, सुशांत सिंग रजपूत यांनी आत्महत्या केली नसुन त्याला ड्रग्ज देऊन मारले आहे. आता मुंबई पोलिस प्रशासन यांचे तपास यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला आणि मे कोर्टाने तपास सीबीआय आणि एनसीबी कडे देण्याचे आदेश दिले. कंगना रानावत प्रकरणात अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून राजकारण तापले होते. परंतु जशी एनसीबी ची एन्ट्री झाली तसे सगळे नसेडी आणि ड्रगीस्ट माफियांचे धाबे दणाणले गेले. वास्तविक पहाता सिने नाट्य क्षेत्राला दारू, ड्रग्ज हे काही नवीन नाही. यापुर्वी सुद्धा सिने जगतातील ज्या मोठ्या प्रमाणावर पार्टी होत होत्या त्या मध्ये सर्रासपणे मदिरा आणि ड्रग्जचा वापर होतच होता. आपण पूर्वीचे काही चित्रपट पाहिले किंवा त्यांची नावे जरी पाहिली तरी ती आम्ली पदार्थच्या तस्करीत गुरफटलेली होतीच. तसेच सिनेमाचे विषय सुद्धा गुन्हेगारी, गुंडगिरी, भाईगीरी, सोने तस्करी अशाच प्रकारची होते. फार मोजकेच चांगले निर्माते आणि दिग्दर्शक सामाजिक, कौटुंबिक विषयावरील चित्रपट तयार करत होते. आता त्याची जागा चंगळवादाने घेतली आहे. सिनेमा सृष्टीत नाव आणि पैसा कमवण्यासाठी कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. त्यातुनच महिला कलाकारांना लैंगिक शोषणाचे बळी ठरावे लागले आहेत. परंतु काम मिळवण्यासाठी काय काय घाणेरडी कृत्ये करावी लागतात हे अनेक महिला कलाकारांनी स्वतः स्पटपणे सांगितले आहे. परंतु खरंच जर असे कास्टिंग काऊच होत असेल तर लगेच तक्रार दाखल करायला पाहिजे. काही काही महिला ब्लॅकमेल सुद्धा करतात.  सध्या लोकसभेच्या अधिवेशनात खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी सुध्दा ड्रग्ज पार्टी आणि माफिया यांचे समर्थन केले आहे. परंतु त्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या त्या वेगळ्याच. महानायक अमिताभ बच्चन यांना ज्या ज्या वेळी काही शारिरीक आजार होतो त्या त्या वेळी देशातील सर्व जनता ते लवकर बरे व्हावेत म्हणून देव पाण्यात घालतात.    खरे तर सिने नाट्य क्षेत्राला दारू आणि ड्रग्ज आवश्यक आहे का ? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात सगळेच कलाकार व्यसनाधिन किंवा ड्रगीस्ट आहेत असे नाही. आज ही खुप असे नट नट्या आहेत की त्यांना घरचा डबा असेल तरच जेवण करतात, कुठल्याही पार्टीत ते जात नाहीत मग मद्यपान आणि आम्ली पदार्थ तर दूरच. सिनेमा सृष्टीत पुढे जाण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी  स्पर्धा आहेच हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. अनेक नामवंत निर्माते आणि दिग्दर्शक हे त्या चित्रपटात कोणाला काम द्यायचे, कोणाला टार्गेट करायचे, कोणाला त्रास द्यायचा हे ठरवून चालू आहे. त्यामुळेच जे स्टारकिड्स आहेत त्यांना जास्त प्रमाणात स्पर्धा करावी लागत नाही, परंतु ज्यांना कोणी गाॅड फादर नाही त्यांना आपले टॅलेंट दाखवण्यासाठी स्ट्रगल करावेच लागते. त्यामुळेच त्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. आणि यातुन ही यश मिळाले नाही तर निराश होऊन अभिनेता आणि अभिनेत्री आत्महत्या करतात. सुशांत सिंग रजपूत याला जाणीव पुर्वक काही ठराविक अभनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी ट्रोल केले, त्याला कामे कशी मिळणार नाहीत याची बांधणी केली, तसेच आपले नावे समोर येणार नाही याची काळजी घेतली आणि यातुन सुशांत सिंग रजपूतचा बळी गेला.तसेच दिशा सालियान च्या बाबतीत सुद्धा घडले आहे. एनसीबी ने काही ड्रग्ज पॅडलर यांना अटक केली आहे, त्यात रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांचा समावेश आहे. आता दिपीका पदुकोण , सारा अली खान आणि दिपिकाची मॅनेजर शर्मा यांना तपास कामी समन्स पाठविले आहे. तसेच पायल घोष हिने सुध्दा अनुराग कश्यप वर लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक सिने जगतातील अभिनेते आणि अभिनेत्री ड्रग्ज चे सेवन करतातच, त्याचे शिवाय त्यांचा दिवस उगवला जातच नाही. त्यामुळे अनेक जणांना आपला प्राण गमवावे लागले आहेत. लफड्यांच्या बाबतीत तर नट नट्या प्रसिद्धच आहेत, मोजकेच काही ठराविक अभनेते किंवा अभिनेत्री असतील त्यांचे कौटुंबिक जीवन सुसंस्कृत असेल. नाहीतर अनेक जण तीन चार लफडे करतातच. जात पात धर्म काही न बघता लग्न करतात आणि नाही पटलं की लगेच सोडून देऊन मोकळे होतात. अशा नसेडी आणि ड्रगीस्ट कलाकार व ड्रग्ज माफिया यांनी भारतीय सिनेमा सृष्टी बदनाम केली आहे, आणि  आपण भोळे भाबडे लोक त्यांचे सिनेमे पहाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतो हे दुर्दैव आहे. खरं तर आतातरी भारतीय नागरिकांनी सतर्क होऊन अशा नसेडी आणि ड्रगीस्ट चित्रपट क्षेत्रातील नट नट्या यांचे चित्रपट पहाणे बंद केले पाहिजे. आपण त्यांचे भूमिकाचा आदर्श घेतो पण ते त्या लायकीचे नसतातच. काही ठराविक  अभिनेते हे भारतीय लोकांना शुद्र समजतात. भारतात राहून पाकिस्तान चे गुणगान गातात अशाना भारतीय लोकांनी धडा शिकवला पाहिजे तरच हे जागेवर येतील. जो पर्यंत अशा नालायक नट नट्या यांना राजकीय आणि शासकीय संरक्षण कवच आहे तो पर्यंत अनेक चांगले होतकरू आणि गुणवत्ता असलेले कलाकार बळीच जातील यात तिळमात्र शंका नाही. खरं तर आपण चित्रपट म्हणजे करमणूक आणि काही तरी संदेश व उपदेशाचे साधन म्हणून पहातो.परंतु प्रत्यक्षात त्याच्या पाठीमागची बाजु फारच काळवंडलेली आहे. अनेक सिनेमा मध्ये साधूसंताची निंदा नालस्ती केली गेली आहे. तसेच काही निर्माते आणि दिग्दर्शक यांनी देशप्रेम आणि उपदेश देणारे चित्रपट सुध्दा निर्माण केले आहेत. परंतु अधिक लोकप्रियता, प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी काही चित्रपट संस्था, नट,नट्या, दिग्दर्शक आणि निर्माता कोणत्याही प्रकारची घाणेरडी कृत्ये करायला मागे पुढे पाहत नाहीत हेच एकमेव सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. खरं तर हा सगळा घाणेरडा प्रकार सरकारने आणि पोलिस प्रशासन यांनी मुळापासून उखडून टाकायला पाहिजे परंतु इथ कुंपणच शेत खातय, आंधळं दळतंय अन् कुत्रे पीठ खातंय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मात्र हिन्दी बातमी  चॅनल बघायचं सोडूनच दिले पाहिजे. बातमीदाराने कसे असावे, त्याची बोली भाषा कशी असायला हवी याला सुद्धा आता आचारसंहिता असायला हवी आहे. केवळ सत्य आणि सत्यच जनतेसमोर आणणे एवढेच चॅनल च्या बातमीदाराचे काम आहे. परंतु सध्याच्या हिन्दी चॅनल च्या बातम्या पाहून किळस यायला लागली आहे. झाकायच्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पहाताना खरोखरच लाज वाटते. असो  तो त्यांचा व्यवसाय आहे. बातम्या साठी आता पत्रकार मंडळी मध्ये सुद्धा स्पर्धा निर्माण झाली आहे आणि त्यातून वैयक्तिक वैर वाढलय हे काल घडलेल्या मुंबईतील पत्रकार मंडळी च्या भांडणावरून दिसुन येते. सध्या मोठं मोठ्या शहरातील  शाळा आणि काॅलेज मध्ये सुद्धा ड्रग्ज पोहचले आहे. देशाची पिढी घडत असलेल्या पवित्र शारदेच्या मंदिरात असे घाणेरडी कृत्ये घडू नये एवढीच अपेक्षा आहे. आता तर कोणतेही क्षेत्र असे नाही की, तिथे महिला भगिनींना कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत नाही. परंतु काही महिला भगिनींना कामाची गरज असते म्हणून त्या बिचा-या अन्यय अत्याचार सहन करतात तर काही भगिनीं अत्याचाराचे विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतात. पण धनदाडंगे आणि राजकीय वरदहस्त असलेले लोक त्यांचा आवाज दाबतात. परंतु कायदा सर्व सामान्य जनतेला आधार देणारे साधन आहे. म्हणूनच जर सगळे पुरावे व्यवस्थित असतील तर निःसंकोचपणे आरोपीला शिक्षा होतेच. तसेच आता जर एनसीबी ला ड्रग्ज च्या बाबतीत सर्व पुरावे आणि साक्षीदार मिळाले तर निश्चितच सिने जगतातील अनेक नट नट्या यांचे पितळ उघडे पडल्या शिवाय राहणार नाही. खर तर अशा अश्लील आणि फालतू प्रकरणामुळे चित्रपट सृष्टी नशेत गुंग झाली आहे.   खर तर आपला आदर्श हे फालतु नट नट्या नसुन अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधान कर्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, मा. राष्ट्रपती डाॅक्टर  ए.पी. जे अब्दुल कलाम, राजमाता जिजाऊ माॅ साहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई हे आपले आदर्श आहेत. जगात कुठेही सर्व जाती जमाती आणि धर्माचे लोक एकत्र पहायला मिळणार नाहीत पण आपला भारत देश हा अठरा पगड जाती जमाती, रूढी व परंपरां, धर्म, संस्कृती आणि साधूसंताचा वारसा असलेला देश आहे. सध्या आपण कोविड-19 सारख्या भयानक महामारी ला सामोरे जात आहोत. त्यामुळे आपली व परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती आहे.            

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर 

99 22 545 545

जाहिरात
Search
विडिओ
Recent News