मेंढपाळ कुटुंबावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने निषेध.


मेंढपाळ कुटुंबावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने निषेध.

श्री . काकासाहेब मांढरे, इंदापूर ( दि. २६ सप्टेंबर ) :

बारामती तालुक्यातील सुपे गावातील धनगर समाजाच्या मेंढपाळ कुटुंबावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व पक्षीय संघटनांच्या वतीने आज (दि.२६) रोजी निषेध करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी इंदापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील सुपे गावात दि. २३ सप्टेंबर २०२० रोजी धनगर समाजातील देवकाते या मेंढपाळ कुटुंबावर अमानुषपणे मारहाण करुन काही समाजकंटकांनी जो भ्याड हल्ला केला.त्या हल्ल्याचा सर्व पक्षीय संघटनांनी निषेध नोंदवून या हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे, आरपीआय जिल्हा संघटक शिवाजी मखरे, आरपीआय तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे,वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हणुमंत कांबळे, हिंदू खाटिक मागासवर्गीय संघटनेचे विजय इंगुले, इंदापूर नगरपरिषद गटनेते कैलास कदम, अहिल्याबाई होळकर जयंती अध्यक्ष पोपटराव पवार, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण, इंदापूर काँग्रेस शहराध्यक्ष तानाजी भोंग, अमोल मिसाळ, नितीन आरडे, सलीम शेख, संदेश सोनवणे, आप्पासो माने, राहुल गुंडेकर, प्रकाश पवार, सौ. राणी कोकाटे, नितीन देशमाने, तोसिफ बागवान, रईस बागवान, गणेश टुले, वसीम शेख, लक्ष्मण देवकाते,यावेळी उपस्थित होते. 


====================================

जाहिरात
Search
विडिओ
Recent News