कर्मयोगी कोव्हिड सेंटर या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार ठरणार - आ.संग्राम जगताप


कर्मयोगी कोव्हिड सेंटर या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार ठरणार - आ.संग्राम जगताप

शहरात कर्मयोगी कोव्हिड सेंटरचे प्रारंभ

सर्वसामान्य कोरोना रुग्णांवर होणार निशुल्क उपचार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) कोरोना माणुसकीपुढे हरणार असून, या संकटकाळात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु करण्यात आलेले कर्मयोगी कोव्हिड सेंटर या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार ठरणार आहे. विनामुल्य सेवा उपलब्ध करुन या कोव्हिड सेंटरच्या संचालकांनी माणुसकीची भावना जपली आहे. जुने एम्स हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असून, कोरोनाची लक्षणे दिसल्यास नागरिकांनी न घाबरता कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. सकारात्मक भावनेने रुग्णांनी उपचार घेऊन बरे होण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

नगर- औरंगाबाद महामार्गावरील जुने एम्स हॉस्पिटल येथे महापालिका आणि कर्मयोगी प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी कोव्हिड सेंटरचे प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक हाजी नजीर अहमद, संजय चोपडा, मन्सूर शेख, उबेद शेख, शाकिर शेख, रफिक मुन्शी, इंजि. अख्तर शेख, अंकुश पालवे, ईश्‍वर बोरा, अफजल शेख, शहर बँकेचे सीओ तन्वीर खान, डॉ.रिजवान अहेमद, डॉ.इम्रान शेख, डॉ. एम.के. शेख, शफी जहागीरदार, समीर खान, नफिस चुडीवाला, आसिफ सुलतान, अ‍ॅड. फारुक बिलाल, साहेबान जहागीरदार,मुजाहिद शेख, एजाज सय्यद, मुश्ताक कुरेशी, इमरान जहागीरदार, फारुक बागवान, सादिक तांबोली, ओजेर सय्यद, इरफान जहागीरदार, फैय्याज शेख, मोहसीन शेख, मुजाहीद कुरेशी, नादीर खान आदिंसह कोव्हिड सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात रफिक मुन्शी यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी हे निशुल्क कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले असून, कोरोनाग्रस्त रुग्णांना अद्यावत उपचार मिळणार आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु करण्यात आलेल्या या कोव्हिड सेंटरसाठी अनेकांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी अहमदनगर शहर बँकेचे सहकार्य लाभत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News