आमदार आशुतोष काळेंकडून ग्रामीण रुग्णालयास १६ ऑक्सिजन बेड,२ व्हेंटीलेटर, २ बायपॅप मशीन !! डॉ. अजय गर्जे


आमदार आशुतोष काळेंकडून ग्रामीण रुग्णालयास १६ ऑक्सिजन बेड,२ व्हेंटीलेटर, २ बायपॅप मशीन !! डॉ. अजय गर्जे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कोरोना बाधित गंभीर रुग्णांना पुढील उपचार कोपरगाव मध्येच मिळावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या विकास निधीतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी १६ ऑक्सिजन बेड, २ व्हेंटीलेटर व २ बायपॅप मशीन दिले असल्याची माहिती रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ.अजय गर्जे  यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यापासून आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला  सर्वोतोपरी मदत केली असून इंफ्राग्रेड थर्मामीटर,ऑक्सिमीटर, पिपीई कीट,एन.९५ मास्क,फेस शिल्ड मास्क अशा प्रकारचे सर्व साहित्य त्यांनी पुरविले आहे. सर्व बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी ते आरोग्य विभागाशी सतत संपर्क ठेवून आहे. कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोपरगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये बहुसंख्य बाधित रुग्ण उपचार घेवून पूर्णपणे बरे देखील झाले आहेत मात्र गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता.गंभीर रुग्णांना शिर्डी येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार मिळावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी प्रयत्न देखील केले मात्र शिर्डीकरांनी विरोध दर्शविला आहे.

   कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत १७०१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून १४९१ बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार होवून हे नागरिक सुखरूप घरी परतले असले तरी दुर्दैवाने ३० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील गंभीर रुग्णांची मदार हि जिल्हा रुग्णालयावरच अवलंबून होती. जिल्हाभरातील गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालयात जात असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात बेड मिळेल याची खात्री  नसल्यामुळे अनेक बाधित रुग्णांना खाजगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत होता तर काही गंभीर रुग्ण जिल्हा रूग्णालयापर्यंत पोहोचू देखील शकले नाही त्या रुग्णांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली आहे. याची आ. आशुतोष काळे यांनी गंभीर दखल घेवून यापुढे कोरोना बाधित गंभीर रुग्णांवर कोपरगावमध्येच उपचार व्हावे यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये १६ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सोबत २ व्हेंटीलेटर व २ बायपॅप मशीन दिले देखील देण्यात आले आहे. एकून २० बेडचे हे अद्यावत अतिदक्षता विभाग लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या मध्ये १६ बेड आयसीयु प्रमाणे असणार असून सर्व बेडला सेंटर ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. ४ बेड साठी व्हेंटीलेटर बसविण्यात येणार असून ५ मॉनिटर, १ डी फेब्रीलेटर मशीन व इसीजी मशीन या विभागात असणार आहे अशी माहिती डॉ. अजय गर्जे  यांनी दिली असून  पुढील आठवड्यात या सुविधा गंभीर व अंत्यवस्थ रुग्णांना मिळणार असल्याचे सांगितले आहे. कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढत असून या रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अद्यावत आयसीयु विभाग सुरु होणार असल्यामुळे गंभीर रुग्णांच्या पुढील उपचाराची सोय उपलब्ध होणार असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर कमी होणार असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News