कास्ट्राईब महासंघाचा बढतीमधील आरक्षण बचाव मार्च आता 30 ऑक्टोबर रोजी होणार!!! महाराष्ट्र सरकारला अल्टीमेटम


कास्ट्राईब महासंघाचा बढतीमधील आरक्षण बचाव मार्च आता 30 ऑक्टोबर रोजी होणार!!! महाराष्ट्र सरकारला अल्टीमेटम

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी ---  पदोन्नतितील आरक्षणाबाबत कास्ट्राईब महासंघाचे पुढाकाराने आरक्षण बचाव मार्च 26 सप्टेबर ते 30 सप्टेबर नागपूर ते मुंबई मा.अरुण गाडे, अध्यक्ष यांचे नेतृत्वात आयोजित होता.

 महाराष्ट्र शासनाने कोवीड 19 महामारीमुळे महाराष्ट्रात 144 कलम लागू असल्यामुळे 5 लोकांचेवर एकत्र येण्यास मनाई असल्यामुळे आरक्षण बचाव संघर्ष समिती द्वारा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे पुढाकाराने नागपूर ते मुंबई आरक्षण बचाव मार्च संस्थगित करण्यात आला असून पुढील तारखेची घोषणा केंद्रीय अध्यक्ष, श्री अरुण गाडे यांनी केली .ऑनलाइन झालेल्या संघटनेच्या कोअर कमिटीच्या मीटिंगमध्ये आरक्षण बचाव मार्च संस्थगित करण्यात आला असून *मा .नरहरी झिरवाळ ,उपाध्यक्ष, विधानसभा महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र सरकारने कोविड परिस्थितिला अनुसरुन केलेल्या आवाहनास अनुसरुन आरक्षण बचाव मोर्चा  पुढील 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे* . सध्याची कोरोणाची स्थितीमुळे राज्य सरकारने मुंबईमध्ये 144 कलम लागू केले आहे .त्यामुळे मार्चची संपूर्ण तयारी केली असतानाही संघटनेने सामाजिक भान ठेवून व राज्य सरकारला सहकार्य करण्याच्या हेतूने आपला पूर्वनियोजित मार्च संस्थगित केला आहे.

परंतु  30 ऑक्टोबरपासून सुरु होणारा मार्च कोणत्याही परिस्थितीत संस्थगित करण्यात येणार नाही . सरकारला संघटनेबरोबर चर्चा करायला वेळ मिळावा व कोरोनाच्या महाभयंकर महामारीत शासनाला सहकार्य करण्यासाठी हा *आरक्षण बचाव मार्च 30 ऑक्टोबरपासून काढण्यात येणार आहे.

सरकारने मराठा समाजाचे आरक्षणात व बहुजनांचे आरक्षणात भेदभाव करु नये.

पदोन्नतीमधील आरक्षण संवैधानिक आहे यावर शासनाने लवकरात लव कर निर्णय घ्यावा.सरकारने आंदोलन ऊग्र होण्याची वाट पाहू नये.

आंदोलनाचा पूढील टप्पा 30 सप्टेबर रोजी सर्व जिल्हाधिकारी यांचेमार्फत सरकारला अल्टीमेटम देण्यात येईल.व प्रत्येक पालकमंत्र्याच्या घरासमोर घंटानाद करुन मागासवर्गियांचे पदोन्नतीमधे आरक्षण तात्काळ लागू करण्याबाबतचे निवेदन देण्यात येईल.

आझाद मैदान मुंबई येथे 1लाख कर्मचाऱ्यांचा लॉन्ग मार्च आयोजित करण्यात येईल . याची शासनाने दखल घ्यावी.या मार्चमध्ये शिव, शाहू फुले ,आंबेडकरी विचाराच्या ४६ बहुजन संघटनांचा आदिवासी ओबीसी, सामाजिक संघटनानी समर्थन दिलेअसुन त्यांचा सहभाग राहणार आहे.

कास्ट्राईब कल्याण महासंघाच्या तातडीने आँनलाईन घेतलेल्या बैठकीत  घेतलेल्या सर्वांचे  एकमत झाले की, 

सरकारने मराठा समाजाचे आरक्षणात व बहुजनांचे आरक्षणात भेदभाव करु नये.आज अनेक अधिकारी विना पदोन्नती सेवानिवृत्त झाले आहेत .

   मराठा आरक्षणासाठी सरकार युध्द स्तरावर प्रयत्न करीत आहे.सरकारचे

अभिनंदन...परंतु  आम्हीही आरक्षणाचे समर्थक आहोत.बहुजनांच्या आरक्षणाच्या मागणीबाबतही

सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी. ऊग्र आंदोलनाची अपेक्षा सरकारने करु नये.आम्ही संवैधानिक मार्गानेच आमचे आंदोलन करणार......

आंदोलनाचा पहीला टप्पा 30 सप्टेबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी यांचेमार्फत शासनाला अल्टीमेटम देणार आहोत.. यामधे पदोन्नतीमधे आरक्षण लागू करणे, रिक्त पदाचा अनुशैष भरुन काढणे, सुशिक्षित बेरोजगांरांना वनोकरी ऊपलध करुन देणे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकावरील अन्याय दुर करणे  ,ओबीसीना पदोन्नतीमधे आरक्षण लागू करणे, ओबीसी करिता लागू असलेली क्रिमिलेआर ची अट रद्द करणे य व ईतर मागण्याबाबत एक महिण्यात पदोन्नतीतील आरक्षणाचा निर्णय घ्यावा....न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल व महाराष्ट्रातील  सर्व जिल्हा पालकमत्र्याच्या निवासस्थानावर घंटानाद करुन निवेदन देण्यात येईल....

शासनाने दखल घेतली नाहीतर 30 आक्टोबर दीक्षाभूमी नागपूर येथुन मा.अरुण गाडे यांचे नेतृत्वात आंदोलनाची सुरुवात होईल आंदोलन  मोर्चाची सुरुवात होऊन महाराष्ट्रातील जिल्हाजिल्हातून घंटानाद करुन सरकारचे लक्ष वेधणार आहे  *शेवटी हा मोर्चा एक लाखाच्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे 3 नोव्हे. रोजी एकत्र येऊन वर्षा बंगल्याकडे धडक देण्यासाठी महामोर्चा जाणार .*या मोर्चामधे महाराष्ट्रातील तमाम Obc Sc StNt Vjnt Sbc बांधवांनी तन-मन धन  देऊन सहकार्य करण्याचे आवाहन गजानन थुल सरचिटणिस,प्रा.गौतम मगरे,अति.महासचिव,आंनदराव खामकर, अति.महासचिव, एकनाथ मोरे, मुख्यसंघटक सचिव,अनिल धांडे मुंबई, कविता मडावी ,चंद्रपूर यांनी केले. असे गौतम कांबळे,महासचिव कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ यांनी कळविले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News