मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने इसळक, निंबळकच्या पड जमीनीवर ताबा गुंठा योजना राबविण्याचा प्रकल्प


मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने इसळक, निंबळकच्या पड जमीनीवर ताबा गुंठा योजना राबविण्याचा प्रकल्प

संघटनेच्या शिष्टमंडळाने केली जागेची पहाणी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) केंद्र व राज्य सरकार पंतप्रधान आवास योजना राबविण्यास असक्षम ठरत असताना, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने लॅण्ड पुलिंग योजनेच्या धर्तीवर ताबा गुंठा योजना राबविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. शेतकरी व घरकुल वंचित भागीदारी पध्दतीने ही योजना पुर्णत्वास नेणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

इसळक, निंबळक येथील शेतकरी घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी लॅण्ड पुलिंग योजनेला खडकाळ पड जमीन देण्यास तयार होते. मात्र केंद्र व राज्य सरकार ही योजना राबविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने स्वत: संघटनेने ही योजना प्रायोगिक तत्वावर पुर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. इसळक, निंबळक येथील शेतकर्‍यांच्या खडकाळ, पड जमीनी घेऊन त्यावर ले आऊट प्लॅन टाकण्यात येणार आहे. शेतकरी असलेला जमीन मालक हा सोसायटीचा मुख्य प्रवर्तक राहणार असून, घरकुल वंचितांना पन्नास ते एक लाखा पर्यंत एक गुंठा जमीन मिळणार आहे. या जागेवर रस्ता, ओपन स्पेसला राखीव ठेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात घरकुल वंचितांसाठी एकही मोठा प्रकल्प उभा राहू शकलेला नाही. घरकुल वंचितांचा आक्रोश सरकारला दिसत नसल्याने संघटनेने हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी अनेक शेतकरी खडकाळ पड जमीन देण्यास तयार आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच इसळक व निंबळकच्या जागेची पहाणी केली. ताबा गुंठा योजना राबविण्यास अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, विलास लामखडे, कॉ.बाबा आरगडे, ओम कदम, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे आदि प्रयत्नशील आहेत.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News