कोपरगाव भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात पंडीतजी दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी


कोपरगाव भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात पंडीतजी दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव -25 सप्टेंबर 1916 रोजी जन्माला आलेले आदर्श थोर समाजसेवक, अर्थतज्ञ, पत्रकार शेवटच्या घटकापर्यंत काम करणारे महापुरूष अशी ख्याती असलेले भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव पंडीतजी दिनदयाळ उपाध्याय हे होते.

प्रदेशसचिव व माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजप माजी जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र काका बोरावके, जिल्हा प्रतिनिधी शरद नाना थोरात, संचालक बाळासाहेब नरोडे, तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम, शहर अध्यक्ष कैलास खैरे, युवामोर्चा जिल्हाउपध्यक्ष सुशांत खैरे, युवामोर्चा अध्यक्ष वैभव आढाव, नगरसेवक स्वप्नील निखाडे, बाळासाहेब केकाण, गोपी गायकवाड, सतीश रानोडे, जगदीश मोरे, रोहन दरपेल, दिनेश गाडेकर आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते. 

याप्रसंगी ॲड. रविकाका बोरावके यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांचे जिवन चरित्रा बाबत माहिती देतांना म्हणाले पंडीत उपाध्याय यांची त्या काळातील प्रॉर्पटी म्हणजे एका पिशवीत फक्त दोन ड्रेस ते घरदार प्रपंच किंवा कोणत्याही नातेवाईकामध्ये गुरफटले नाही. त्या काळातील कम्युनिझम विचार, साम्यवाद, भांडवलदार शाहीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना होत असतांना उडी घेतली. वयाच्या 18 वर्षापासुन आदर्श विचार मांडणे ज्या नेत्याने कधीही आमदार, खासदारकी चे स्वप्न पाहिले नाही. त्यांचे काही वर्ष रेल्वेस्टेशनवरच गेले. ज्यावेळी नेहरूंच्या काळात डॉ.शामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते तेंव्हा गोरगरीबांचे हाल भ्रष्टाचार होत असतांना या बाबत शामाप्रसाद यांनी आवज उठविला परंतू त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्या काळात कॉग्रेस पदाचा राजीनामा देवुन यापुढे कॉग्रेस संपुष्टात आणल्या शिवाय मी राहाणार नाही अशी शामाप्रसाद यांनी शपथ घेतली. पहिले भाजपाचे अध्यक्ष म्हणुन शामाप्रसाद यांची वर्णी लागली. त्यावेळी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांनी सरचिटणीस म्हणुन काम पाहिले. या थोर पुरूषामुळेच आज केंद्रामध्ये भाजपाची सत्ता पाहावयास मिळत आहे. या लोकांनी शेवटच्या घटकापर्यत कामे व्हावे, प्रत्येकाला घर मिळावे, प्रत्येकाच्या बँक खात्यावर पैसे मिळावे याची अंमलबजावणी आपले मान. पंतप्रधान मोदी साहेबांनी  केली आहे. यावेळी साहेबराव रोहोम यांचे भाषण झाले तर सुत्रसंचलन सुशांत खैरे यांनी केले तर कैलास खैरे यांनी आभार व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News