इंदापूरात धनगर समाजाये आरक्षणासह इतर मागण्यांकरिता ढोल बजाओ आंदोलन


इंदापूरात धनगर समाजाये आरक्षणासह इतर मागण्यांकरिता ढोल बजाओ आंदोलन

श्री .काकासाहेब मांढरे ,इंदापूर प्रतिनिधी ( दि. २५ सप्टेंबर ) :

धनगर समाज हा कायम शासकीय सुविधांपासुन वंचित राहिला आहे.त्यामुळे मागील फडणवीस सरकारने योग्य पावले ऊचलत २२ योजना लागू करुन इतरही योजना जाहीर केल्या त्या तात्काळ लागू कराव्यात व इतर मागण्यांचे निवेदन ढोल बजाओ आंदोलन करत तहसिलदारांना देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज हा आपल्या हक्कांची लढाई कायद्याने लढत आहे.या पार्श्वभूमीवर धनगर समाजासाठी विद्यमान विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर आदिवासी प्रमाणे २२ सवलती लागू केल्या होत्या. तसेच शेळी मेंढीपालन महामंडळास १००० कोटी जाहिर केले होते. त्याची अंमलबजावणी त्वरीत करावी व आरक्षणासाठी जी देवेंद्र फडणवीस सरकारने ठोस पावले उचलली होती, तशी या सरकारने उचलावीत. या व इतर मागण्या मान्य करणेसाठी झोपलेल्या सरकारला जाग यावी यासाठी आज तहसिलदार यांना निवेदन देणेसाठी आज ढोल बजाओ आंदोलन इंदापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले.सदरचे मागण्यांचे लेखी निवेदन इंदापूरच्या तहसिलदार सोनाली मेटकरी यांचेकडे सुपुर्त करण्यात आले. आमच्या भावना सरकार दरबारी पाठवाव्यात अशी विनंती या निवेदनात करण्यात आली. यावेळी भाजपाचे इंदापूर तालुका अध्यक्ष ऍड. शरद जामदार, माऊली चवरे,रामभाऊ पाटील,माऊली वाघमोडे,महेंद्र रेदके,भाऊसाहेब अर्जुन,गणपत करे, बापू पारेकर्,तानाजी मारकड,श्रवण चोरमले,बाळासाहेब डोंबाळे आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News