अक्षय केदार यांचा सावली दिव्यांग संस्थेकडून सन्मान


अक्षय केदार यांचा सावली दिव्यांग संस्थेकडून सन्मान

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवाना शासनाच्या विविध योजना मिळण्यासाठी, दिव्यांगाच्या ज्वलंत प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडण्यासाठी सदैव शेवगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण आहे :-चाँद शेख

कोरोना जागतीक महामारीमुळे संपुर्ण जग संकटात असतांना या संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर,पोलीस, अरोग्यसेवक ,सफाई कामगार, पत्रकार हे करत असलेले कार्य निश्तीत गौरवशाली आहे याच गौरवात भर टाकण्याचे काम शेवगाव मधील सर्व पत्रकार करत आहे.शेवगाव तालुक्यातील दिव्यांगाच्या ज्वलंत प्रश्नाना वाचा फोडून दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण आहे..लॉक डाऊन च्या काळातील पत्रकार अक्षय केदार यांच्या कामाची दखल सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी दखल घेतली.सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावली संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख ,सावली दिव्यांग संघटना शेवगाव शहर अध्यक्ष गणेश महाजन,सावली दिव्यांग संघटनेचे कार्याध्यक्ष मनोहर मराठे,कृष्णकांत सोनवणे यांच्या हस्ते पत्रकार अक्षय केदार यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देवुन  सावली दिव्यांग संस्थेचे वतीने कोव्हीड योध्दा म्हणुन सन्मानीत कण्यात आले.यावेळी  सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष चाँद शेख, नवनाथ औटी,गणेश महाजन, सुनील वाळके,संभाजी गुठे,बाहुबली वायकर,खलील शेख,मनोहर मराठे,अशोक कुसळकर,भाऊसाहेब गव्हाणे,एकनाथ धाने,भरत साळुंके,महबूब सय्यद,बाबासाहेब गडाख,विठ्ठल दहिवळकर,गोविंद बाहेती,निलोफर शेख,सोनाली चेडे,सुवर्णा देशमुख,सकू मिसाळ, वंदना तुजारे, संजीवनी आदमाने,आदी पदाधिकारी व दिव्यांग बांधवाकडून तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्यासह अक्षय केदार यांनी दिव्यांग बांधवाना करत असलेल्या मदत  कार्याबद्दल आभार मानले तसेच पत्रकार अक्षय केदार यांचे अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News