काष्टीत जायभाय काॕम्प्लेकला आग ४० लाखाचे नुकसान


काष्टीत जायभाय काॕम्प्लेकला आग ४० लाखाचे नुकसान

काष्टी जायभाय काॕम्प्लेक्स मधील लागलेल्याआगीत दुकानाचे झालेले नुकसान (छायाः अंकुश तुपे )

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी: श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील जायभाय काॕम्प्लेक्स मधील दुकानाला आग लागून येथील राजस्थानी तुळसाराम गंगाराम चौधरी (३७) यांच्या  तुलसी जनल स्टोअर्स व तुलसी गिप्ट हाऊस हे दोन्ही दुकाने लागलेल्या आगीत जळून खाक झाले असुन यामध्ये सुमारे ४० लाखाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज असुन हि आग नेमकी कशी लागली हे मात्र संशस्पद असल्याने पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करीत आहे.

सविस्तर   माहिती अशी कि दि.२५ रोजी पहाटे दोन च्या सुमारास गावातील नगर-दौड रोडवर नागवडे पेट्रोल पंपाच्या शेजारी जायभाय काॕम्प्लेक्स आहे.रात्रीच्या वेळी श्रीगोंदा पोलिस   स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सतिष गावित हे सहकार्यासह रात्रीचे संपूर्ण गावात गस्त घालित असताना अचानक  जायभाय काॕम्प्लेक्स जवळ धुर दिसला त्यावेळी त्यांना वाटले कोणीतरी शेकोटी करुण शेकत आहे.परंतु  जवळ जावून पाहिले तर येथील तुलसी जनल स्टोअर्स या दुकानातून आगीचा धुर येताना दिसला त्यावेळी वेळेचे गांभीर्य ओळखू गावित यांनी श्रीगोंदा नगर पालिकेच्या अग्नीशामक दलातील पथकाला माहिती देवून बोलावून घेतले तोपर्यंत  सदर काॕम्प्लेक्स मधील सर्व दुकानदार व्यावसायिक लोकांना घटनेची माहिती दिली अनेक जन रात्रीची वेळ असल्याने  फोन घेत नव्हते तोपर्यंत इकडे आगीने उग्ररुप धारण केले होते. घनास्थळी उपसरपंच सुनिल पाचपुते,उद्योजक सतिष कुतवळ, आदेश नागवडे, अनेक लोक  दाखल झाले यावेळी नागवडे साखर कारखान्यातील अग्नीशामक बंब बोलवून दोन्ही फायर ब्रिगेडच्या मदतीने रात्री दोन ते पहाटे सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आनण्यात यश आले. आग लागली तेव्हा शेजारी नागवडे पेट्रोल पंप असल्यामुळे मोठा धोका होता तसेच याच इमारती मध्ये युनियन बॕक,महाराष्ट्र बॕक, श्रीराम पतसंस्था,हरिओम मशीनरी,भैरवनाथ शेती भांडार,सायन्स अॕकाडमी क्लास,श्रीफोटो स्टुडिओ    यासह अनेक व्यावसायिक दुकानासह बॕकेचे दोन एटीम मशीन आहेत आग लवकर विझविल्याने पुढील अनर्थ जरी टळला असला तरी आगीची झळ मात्र सर्वाना पोहचली आहे.मात्र यामध्ये तुलसी जनरल स्टोअर्स व गिप्ट हाऊस यांचे दोन्ही दुकानाचे सुमारे ४० लाखा पर्यायतचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी  कशी लागली हे मात्र संशयास्पद असुन घटस्थळी आमदार बबनराव पाचपुते,जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी भेट देवून पहाणी केली. पुढील तपास पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरु आहे.  


जाहिरात
Search
विडिओ
Recent News