अहमदनगर :(प्रतिनिधी संजय सावंत) पाईपलाईन रोड, एकवीरा चौकातील प्रशस्त अशा "सरप्लस हाऊस" या कापड दालनाचे आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते व आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
शुभारंभप्रसंगी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले, लॉकडाऊनच्या काळातही गजबजलेल्या सावेडी भागात कापड दुकान सुरु करून येथील ग्राहकांना नवनवीन व्हरायटीचे व आकर्षक अशा ब्रॅण्डेड कंपन्यांचे शर्ट, जीन्स तेही लिकोपर, स्पायकर, मुफ्ती अशा नामांकित कंपन्यांचे शर्ट, जीन्स तेही वाजवी दरात होलसेल व रिटेलमध्ये येथे मिळणार आहेत.
ग्राहकांना चांगल्या दर्जाचे व मापक दरात शर्ट व जीन्स विविध डिझाईन व व्हरायटीमध्ये येथे भरपूर प्रमाणात पहावयास मिळणार आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशा दरामध्ये असल्याने औरंगाबाद व मराठवाडा येथील दुकानदार व ग्राहकही येथे खरेदीसाठी येथील असा विश्वास आ. जगताप यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास सय्यद अख्तर अली, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मन्सूर शेख, नगरसेवक नज्जु पैलवान, सुनील काळे, उबेद शेख, मुश्ताक कुरेशी, रफीक मुन्शी, अब्दुलसेठ, अब्दुल सलाम आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालक अरबाब सय्यद यांनी सर्वांचे स्वागत केले. सय्यद साजिद, सय्यद माजिद, सय्यद शादाब, सय्यद आफताब आदींनी पाहुण्यांचे सत्कार व चहा-पान करून स्वागत केले