समृध्दी महामार्ग कार्यक्षेत्रातील खराब रस्ते गायत्री कंपनीने दुरुस्त करून द्यावे !!ॲड. नितिन


समृध्दी महामार्ग कार्यक्षेत्रातील खराब रस्ते गायत्री कंपनीने दुरुस्त करून द्यावे !!ॲड. नितिन

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्याला पावसा बरोबरच तालुक्यातून जाणारा समृद्धी महामार्ग जबाबदार असून तालुक्यातील रस्ते गायत्री कंपनीने  दुरुस्त करून घ्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे 

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातून जात असून देर्डे ते धोत्रे या सुमारे पंचवीस तीस किलो मीटर भागात गेल्या एक दीड वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे त्यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूने साधारण वीस किलो मीटर परिसरातून या कालावधीत गायत्री कंपनी मोठं मोठ्या डंपर द्वारे माती मुरूम वाहतूक करत आहेत.या वजनदार डंपर मुळे तालुक्याच्या रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून नगर मनमाड महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते अंतिम स्वास घेत आहेत या रस्त्याच्या दुरावस्थेस पावसा बरोबरच समृद्धी महामार्गाचे ठेकेदार जबाबदार आहेत 

एका बाजूला समृद्धी महामार्गाने विदर्भ मराठवाड्यात समृद्धी येण्याचे स्वप्न दाखवले असले तरी कोपरगाव तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत भयावह झाली आहे

कोपरगाव तालुक्याच्या रस्त्याच्या दुरावस्थेस शासनाकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी नगर मनमाड रस्त्याच्या दुरुस्ती साठी चाळीस कोटींची घोषणा केली मात्र ह्या रस्त्याची दुरुस्ती होईल पण ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त होण्यास सरकारी नियमा प्रमाणे मार्च एंडिंग ची वाट पहावी लागेल त्यातच करोना साथीच्या आजाराने सरकारच्या तिजोरीची वाट लागलेली आहे. सद्या तरी पावसामुळे समृद्धी महामार्गाचे काम बंद आहे त्यांच्याकडे असलेली डंपर,जेसीबी सारखी यंत्रणा बंद आहे असे असताना जिल्हाधिकारी यांनी संबंधित रस्त्याच्या दुरावस्थेस गायत्री कंपनी जबाबदार आहे असे गृहीत धरून त्यांच्या कडे उपलब्ध असलेल्या यंत्रणे कडून तालुक्यातील रस्त्यावर तात्पुरता मुरूम टाकल्यास कोपरगाव तालुक्यातील जनतेला दिलासा मिळेल व किमान या रस्त्यावर होणारे अपघात व निष्पाप बळी वाचतील असे या पत्रकात म्हटले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News