नगरपालिका हद्दीतील विविध विकासकांमासाठी विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत


नगरपालिका हद्दीतील विविध विकासकांमासाठी विशेष रस्ता  अनुदान योजनेअंतर्गत

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी :

श्रीगोंदा नगरपरिषदेस महाराष्ट्र शासनाकडून २ कोटी रु प्राप्त --- सौ ,शुभांगीताई पोटे (नगराध्यक्ष) यामध्ये प्रामुख्याने आय टी आय कॉलेज ते विशाल हॉटेल(वडाळी रोड) साठी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणें ८० लक्ष रु ,मांडवगण रोड ते वडाळी रोड (शिक्षक कॉलनी मार्गे) रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ४५ लक्ष रु,शनीचौक ते शिवाजी चौक रस्ता काँक्रीटीकरण करणे यासाठी ७५ लक्ष रु असे एकूण २ कोटी रु महाराष्ट्रसरकार कडून आज मंजूर झाले आहेत

याशिवाय श्रीगोंदा शहर विकास कामातून हाय टेक बनविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे , राज्यात कोरोना संकटामुळे पगार आणि विकास कामांच्या निधीत कपात असताना सुद्धा नगराध्यक्षपती गटनेते मा,मनोहर पोटे यांनी मात्र महाविकास आघाडी सरकारकडून श्रीगोंदा न,प, साठी माघील महिन्यात ३ कोटी रु,व आज २ कोटी रु असे एकूण ५ कोटी रु निधी योग्य नियोजन करून प्राप्त करून घेतला आहे 

या सर्व निधीसाठी मा,बाळासाहेबजी थोरात(महसूलमंत्री महा राज्य),मा,एकनाथराव शिंदे साहेब(नगरविकासमंत्री),मा,हसनजी मुश्रीफसाहेब(पालकमंत्री अनगर)मा,शंकरराव गडाख साहेब( जलसंधारणमंत्री महा राज्य), मा,प्राजक्तदादा तनपुरे(नगरविकास राज्यमंत्री महा,राज्य)यांच्या सहकार्याने व मा,बाबासाहेबजी भोस,मा,राहुलदादा जगताप,मा,घनश्यामआण्णा शेलार,मा,सौ,अनुराधाताई नागवडे, मा,दीपकपाटील भोसले यांच्या मार्गदर्शना खाली श्रीगोंदा नगरपरिषद ला भरघोस निधी मिळाला आहे

भविष्यात श्रीगोंदा शहरातील जनतेने टाकलेल्या विश्वासास पात्र राहून शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मी व आमचे सहकारी नगरसेवक प्रयत्नशील राहू असे गटनेते मनोहर पोटे म्हणाले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News