धनगर समाजातील मेंढपाळांवर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी, सुपे येथे गुन्हा दाखल


धनगर समाजातील मेंढपाळांवर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी, सुपे  येथे गुन्हा दाखल

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

सध्या राज्यात मेंढपाळांवर अनेक ठिकाणी हल्ले होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र, मेंढपाळांवरील हल्ल्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही, त्यांच्या संरक्षणासाठी पुढे येत नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राच्या लोकशाहीला न शोभणारी गोष्ट आहे. 

    बारामती तालुक्यातील सुपे जवळील सोनपीरवाडी या ठिकाणी बुधवार दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास धनगर समाजातील सुखदेव लालू देवकाते, शंकर लालू देवकाते, दादा बाळू कोकरे, ताईबाई बापू लकडे यांना मुस्लिम समाजातील नऊ ते दहा लोकांनी लाकडी काठीने, हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. त्या लोकांविरुद्ध सुपे पोलीस चौकीत कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे. वेळीच मेंढपाळांवरील हल्लेखोरांवर कारवाई व्हावी तसेच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी अन्यथा मेंढपाळांचा भव्य मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बालेकिल्यात "राष्ट्रवादी" चे पदाधिकारी बापुराव सोलनकर यांनी देत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 

    राज्यातील मेंढपाळ बकरी चारण्यासाठी सतत वणवण भटकतात. ऊन, वीज, वारा, पाऊस यांचा विचार न करता तसेच आपला जीव धोक्यात घालून मेंढ्या सांभाळत आहेत. वीज पडून अनेक ठिकाणी मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत, तसेच काही ठिकाणी मेंढपाळांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या संकटाच्या काळात माणुसकी दाखवणे गरजेचे आहे. परंतु काही ठिकाणी मेंढपाळांवर सातत्याने हल्ले होत आहेत. कोरोना परिस्थिती मुळे तर दिवसाला ३ ते ४ ठिकाणी रोज मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखण्याची गरज आहे. सरकारने यापुढे हल्ले करणाऱ्यांना जरब बसेल असा ऍट्रोसिटी सारखा कठोर कायदा करून शासन केले पाहिजे. समाज कंटकांकडून होणारी अरेरावी, जातीवाचक शिवीगाळ, मेंढ्या चोरून नेणे, काही गावात स्थानिक लोकांकडून मेंढपाळ समाज बांधवांना मारहाण, तसेच काही ठिकाणी मेंढपाळांनी आपला जीव गमवला आहे. मेंढपाळांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे अशा हल्ला करणाऱ्या नराधमांवर कडक शासन करा. त्यांच्या कुटुंबांना बंदुकीचा परवाना व संरक्षण द्या, अशी मागणी सोलनकर यांनी केली आहे.

   सुपे याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष ऍड. अमोल सातकर, दिलीपआप्पा खैरे,  संपतराव टकले, माणिकराव काळे,  सामाजिक कार्यकर्त्या कल्याणीताई वाघमोडे, डॉ.सुजित वाघमोडे, मेंढपाळपुत्र आंदोलन प्रमुख आनंदराव कोकरे, निलेश मासाळ, सोनबा लकडे, सतीश ठोंबरे आदींनी या मारहाण झालेल्या जखमींची विचारपूस करून गुन्हा दाखल करण्यास मदत केली. 

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक सुभाष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब मत्रे व सूर्यकांत कुलकर्णीसाहेब या घटनेचा तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News