बांधकाम कामगारांनी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या बि.डी.ओ .यानां. निवेदन दिले आहे.


बांधकाम कामगारांनी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या बि.डी.ओ .यानां. निवेदन दिले आहे.

सज्जाद पठाण  शेवगाव प्रतिनिधी: शेवगाव तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायती मथधील ग्रामसेवक बांधकाम कामगारांच्या ९० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर सही देत नसल्याने संतप्त कामगारांनी आज जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती शेवगावचे गटविकास अधिकारी, यांना निवेदन दिले. यावेळी जनशक्ती श्रमिक संघाचे अध्यक्ष सोपानराव पूरनाळे, सचिव संजय दुधाडे, जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय आंधळे आदि प्रमुख उपस्थितीत होते. निवेदनात म्हंटले आहे की, मौजे चापडगाव येथील बांधकाम कामगारांच्या ९० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक सही करत नसल्याची लेखी तक्रार दि १६/०९/२०२० रोजी जनशक्ती श्रमिक संघ, शेवगाव यांच्याकडे केली होती. या मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी व नुतणीकरण करण्यासाठी बांधकाम कामगाराना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ग्रामीण भागातील बांधकाम कामगाराच्या प्रमाणपत्रावर  ग्रामसेवकाने खात्री करून सही करण्याचे आदेश आहेत. असे असतांना देखील चापडगाव येथील बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर ठेकेदारांची सही असतांना देखिल ग्रामसेवक त्या प्रमाणपत्रावर सही करत नसून उलट बांधकाम कामगारांना अरेरावीची व उद्धट भाषा वापरली जाते. कोविड १९ या रोगाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा सात महिन्यापासून बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी बंद होती. संघटनेच्या प्रयत्नातून ऑनलाईन नोंदणी आता चालू झाली आहे. त्यामुळे या कामगारांच्या प्रमाणपत्रावर सही न करणे हि बाब अत्यंत चुकीची आहे. सदरच्या कामगारांना शासनाच्या लाभापासून वंचित रहावे लागल्यास याला जबाबदार कोण. या बाबत शेवगाव तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांची सत्यता पडताळून बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर सह्या देण्याचे आदेश देण्यात यावेत. जर बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवकाने सह्या न दिल्यास पंचायत समिती शेवगाव कार्यालयावर दि.२९/०९/२०२० रोजी तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार धरणे व आंदोलन करणार असल्याचे देखील निवेदनात म्हंटले आहे. यावेळी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सर्व ग्रामसेवकांना प्रमाणपत्रावर सह्या करण्याचे लेखी आदेश देणार असल्याचे यावेळी सांगितले. निवेदनावर अंबादास विघ्ने, विघ्नेश्वर फुंदे, लंकाबाई केदार, नागनाथ मते, जगदीश नेमाने, संतोष पातकळ, कृष्णा दिवटे, बाबासाहेब ढाकणे, रामा खंडागळे, संजय धायगुडे, सुनील दारकुंडे यांच्या सह्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News