काष्टी येथील तरुणांचे उपोषण यशस्वी,जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात केल्या मागण्या मान्य,तरुणांचे गावात जलोषात स्वागत


काष्टी येथील तरुणांचे उपोषण यशस्वी,जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात केल्या मागण्या मान्य,तरुणांचे गावात जलोषात स्वागत

विठ्ठल होले पुणे

काष्टी प्रतिनिधी --- काष्टी येथील तरुणांनी गावातील अतिक्रमण विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले होते,त्याला काही अडचणी वगळता बाकी सर्व ठीक झाले आहे,जिल्हाधिकारी कार्यालय येथील अधिकाऱ्यांनी या तरुणांनी केलेल्या मागण्या मान्य करून उपोषण मागे घेण्यास सांगितले, मान्य झालेल्या मागण्या पुढील प्रमाणे --- 

मागणी क्रमांक 1 

पहिल्या मजल्यावरील ग्रामपंचायत कार्यालय खाली आणणे

उत्तर- आजपासून एक महिन्याच्या आत कार्यालय खाली घेणे सूचना दिल्या आहेत

मागणी क्रमांक 2

माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद हायकोर्टाचे आदेशाप्रमाणे 32 गाळ्यांचे लिलाव करणे

उत्तर- लिलाव करण्यास अडीच महिन्याचा कालावधी मागितला आहे

मागणी क्रमांक 3

प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा काष्टी यांच्या जागेवरील अतिक्रमण काढणे

उत्तर- वरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा परिषदेने 15 दिवसांमध्ये अधिकारी नेमून त्यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी देऊन तातडीने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत

मागणी क्रमांक 4

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काष्टी यांच्या आवारात चालू असलेल्या आरोग्य केंद्राचे बांधकाम थांबवण्याबाबत

उत्तर- राष्ट्रीय आरोग्य विभाग व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व राज्य आरोग्य सोसायटी मुंबई यांच्या निधीतून हे काम चालू असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या अधिकारात हे काम थांबवू शकत नाहीत परंतु लातूर मुंबई महाराष्ट्र हा राज्य महामार्ग गावातील गावाच्या बाहेरून की गावातून जाणार आहे याची कल्पना नाही त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण कागदपत्रे  MSRDC चा नकाशा येत नाही तोपर्यंत बांधकाम बंद ठेवण्यात यांनी संबंधित ठेकेदाराला सांगितलेले आहे व आम्ही उपोषणकर्ते  संबंधित विभागाला पत्र देऊन आम्ही केलेल्या उपोषणाची सर्व पत्र देऊन संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर जागेतील अडचणी समजून सांगून हॉस्पिटलची जागा बदलण्यास सांगणार आहोत अशा प्रकारे लेखी स्वरूपात मान्य करून लोकशाही पद्धतीने सुरू केलेले उपोषण समाधान कारक चर्चेने कालिदास जगताप सभापती श्रीगोंदा पंचायत समिती,शंकर पाडळे शिक्षण अधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडण्यात आले आहे,तरुणांनी केलेल्या कार्याला गावातून चांगला प्रतिसाद मिळाला, शोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रतिसाद मिळाला त्यामुळे हे उपोषण यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे,त्यामुळे काष्टी गावात तरुणांचे जलोशात स्वागत करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News