वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या !! स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी


वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या !! स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव विधानसभा मतदार संघात वादळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे प्रशासनाने 14 गावांसाठी पंचनाम्याचे आदेश पारीत केले परंतु वादळी पावसामुळे संपूर्ण मतदारंसघातील पिके नष्ट झाली असुन 14 गावांसाठी पारित केलेल्या पंचनाम्या आदेषा व्यतिरिक्त मतदारसंघातील इतर गावातील पिकांचेही देखील मोठया प्रमाणात नुकसान  झालेले आहे तरी याही नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नहेलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री,महसुलमंञी,कृपीमंत्री, जिल्हयाचे पालकमंत्री यांचकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वादळी पावसामुळे शेतातील उभी पिके,मका,कपाशी,बाजरी, सोयाबीन,कांदारोपे,या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, पावसाच्या तडाख्यामुळे उभी असलेले पीके पूर्णपणे खराब झाले.

 यापुर्वीही या भागावर नैसर्गिक आपत्ती येवून मोठया प्रमाणात नुकसान झाले होते,या संकटातून सावरतांनाच पुन्हा शेतक-यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. यासाठी शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने  14 गावांसाठी पंचनाम्यांचे आदेश पारित केले त्यात अनेक गावांचा उल्लेख न झाल्याने अंजनापुर,बहादरपुर, धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद, वेस,सोयेगांव,रांजणगांव देशमुख, काकडी मल्हारवाडी,डांगेवाडी, मनेगांव या भागातील शेतक-यांनी संपर्क कार्यालयात समक्ष येवुन नुकसान भरपाई मिळावी म्हणून लेखी मागणी केलेली आहे. 

सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शेतक-यावर मोठे आर्थीक संकट आले आहे, त्यामुळे उदरनिर्वाहाबरोबर अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहे, शेतक-यांनी उसनवारी करुन आपले शेतात पेरणी केली होती, काही दिवसातच या पिकांची काढणी होवुन शेतक-यांच्या दारात धान्याची रास पडली असती मात्र झालेल्या वादळी पावसाने शेतक-यांचे स्वप्नच उध्वस्त करुन टाकले आहे. शासन स्तरावरुन त्वरीत मतदारसंघातील सर्वच नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई मिळवुन देण्यासाठी संबधित कार्यान्वीत यंत्रणेस आपले त्वरीत आदेश व्हावेत अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News