आखेगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न!!


आखेगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न!!

शेवगाव प्रतिनिधी, सज्जाद पठाण 

तालुक्यातील आखेगाव येथे दिनांक २४ वार गुरुवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते,कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने ग्रामीण भागामध्ये होत असलेले रक्तदान शिबिर ही काळाची गरज बनली आहे त्यामुळे आखेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये रक्तदान शिबिर होणे आदर्श बाब आहे, या रक्तदान शिबिराचे आयोजन आखेगाव येथील समर्थ ग्रामविकास क्रीडा मंडळ स्वयंसेवी संस्था व कै.सरस्वतीबाई भानुदास डोंगरे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांनी आपल्या सर्व टीम सह रक्तदान शिबिरासाठी संपूर्ण टीम यामध्ये डॉ. दिलीप माने (B.T.O) डॉ. विलास मढीकर (P.R.O), टेक्निशियन त्रिवेणी मोहरे, नर्स गया चव्हाण, सोशल वर्कर विनिता धामणगावकर व मनीषा जोशी, मदतनीस खरपुडे व फंड हे सर्वजण शिबिरासाठी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरासाठी आखेगाव येथील तरुणांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला, या शिबिरामध्ये १६ तरुणांनी रक्तदान केले, यामध्ये अशोक काकडे, बाळासाहेब डोंगरे ,काकासाहेब डोंगरे ,अमोल पायघंन, सुरेश काटे, प्रसाद डोंगरे, अक्षय डोंगरे, महेश करपे, गोरक्ष लाड, किशोर बिडकर, राहूल डोंगरे, संदीप कोल्हे ,संदीप बा, योगिता डोंगरे व इतरांनी सहभाग नोंदवला, शिबिरा प्रसंगी सहभाग घेतलेल्या सर्व तरुणांनी कोरोना महामारी मुळे सर्वांनी सोशल डिस्टन्स सर्व नियमांचे पालन केले, याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ मुंडे यांनी भेट दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News