कोरोना योध्दांच्या हस्ते कोतवाली पोलीस स्टेशनला वृक्षरोपण सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने कोरोना काळात योगदान देणार्‍यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान


कोरोना योध्दांच्या हस्ते कोतवाली पोलीस स्टेशनला वृक्षरोपण  सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने  कोरोना काळात योगदान देणार्‍यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान

कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देऊन योगदान देणार्‍या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सावली दिव्यांग कल्याणकारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रवीण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे, संजय सावंत, संकेत पुरोहित यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे व बाहुबली वायकर. (छाया-वाजिद शेख-नगर)

सर्व नागरिकांनी कोरोना योध्दांची भूमिका पार पाडावी -पो.नि. प्रवीण लोखंडे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देऊन योगदान देणार्‍या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सावली दिव्यांग कल्याणकारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. तर या कोरोना योध्दांच्या हस्ते कोतवाली पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले.  

सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रवीण लोखंडे, डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे, पत्रकार संजय सावंत, आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डायलिसीस टेक्नेशीयन संकेत पुरोहित यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानपत्र प्रदान केले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना नियमांचे पालन होण्यासाठी पो.नि. प्रवीण लोखंडे विशेष प्रयत्नशील आहेत. सामाजिक कार्यकर्ते नाना डोंगरे यांनी कोरोना काळात ग्रामीण भागात जनजागृती करुन अनेक गरजूंना मदतीचा हात दिला. पत्रकार संजय सावंत यांनी समाज जागृतीसाठी योगदान दिले. तर संकेत पुरोहित यांनी सर्वसामान्य रुग्णांना सामाजिक भावनेने सहकार्य केल्याची दखल घेत त्यांना कोरोना योध्दा सन्मान बहाल करण्यात आल्याचे महापुरे यांनी स्पष्ट केले. तर सावली संस्था दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत असून, सामाजिक कार्यासाठी देखील पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.नाना डोंगरे यांनी माणुसकीच्या नात्याने अनेक योगदान देत असल्याने या महामारीवर आपल्याला विजय मिळवता येणार असल्याचे सांगितले. पो.नि. प्रवीण लोखंडे यांनी सर्व नागरिकांनी कोरोना योध्दांची भूमिका पार पडल्यास कोरोनाला अटकाव आनता येणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाय योजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शासनाने केलेले नियम सर्वसामान्यांच्या चांगल्यासाठी असून, याची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना डोंगरे यांनी केले. आभार बाहुबली वायकर यांनी मानले

सावली दिव्यांग कल्याणकारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कोरोना योध्दांच्या हस्ते कोतवाली पोलीस स्टेशनला वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी पो.नि. प्रवीण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे, संजय सावंत, संकेत पुरोहित यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर. (छाया-वाजिद शेख-नगर)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News