केडगाव येथील राजमाता कोविड सेंटर सर्वसामान्यांसाठी आधार


केडगाव येथील राजमाता कोविड सेंटर सर्वसामान्यांसाठी आधार

विशेष तज्ञ डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून एकत्र येऊन सुरु केले कोविड सेंटर!! 150 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शहरातील नामवंत व विशेष तज्ञ डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून एकत्र येऊन सुरु केलेले केडगाव येथील राजमाता कोविड सेंटर सर्वसामान्यांसाठी आधार ठरले आहे. या कोविड सेंटरमधून 150 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शहरातील रुग्णालयातील बेड देखील कमी पडू लागली आहेत. अशा परिस्थितीत कोरोनापासून सर्वसामान्य रुग्णांना वाचविण्यासाठी डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ.परमेश्‍वर काळे, डॉ.सतिष फाटके, डॉ.चंद्रकांत कदम, डॉ.सुनिल जाधव, डॉ.प्रमोद जगताप, डॉ.प्रणाली त्रिमुखे, डॉ.प्रदीप जैस्वाल यांनी पुढाकार घेऊन केडगावला राजमाता कोविड सेंटर कार्यान्वीत केले आहे. या कोविड सेंटरमध्ये 10 फिजीशीयनची टिम कार्यरत असून, तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर रुग्ण देखील कव्हर झाले असल्याचे डॉ. रणजीत सत्रे यांनी सांगितले. डॉ.परमेश्‍वर काळे म्हणाले की, शहरातील नामवंत डॉक्टरांनी सेवा देण्याच्या हेतूने हे कोविड सेंटर सुरु केले असून, याचा लाभ सर्वसामान्य मिळत असल्याचे स्पष्ट केले. डॉ. प्राजक्ता पारधे यांनी तज्ञ डॉक्टरांची टीम कोरोना रुग्णांची काळजी घेत असल्याने रुग्ण देखील बरे होत असल्याचे सांगून कोविड सेंटर मध्ये असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली.शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शहरातील डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ.परमेश्‍वर काळे, डॉ.सतिष फाटके, डॉ.चंद्रकांत कदम, डॉ.सुनिल जाधव, डॉ.प्रमोद जगताप, डॉ.प्रणाली त्रिमुखे, डॉ.प्रदीप जैस्वाल या तज्ञ डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून केडगाव येथे सुरु केलेले राजमाता कोविड सेंटर. शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शहरातील डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ.परमेश्‍वर काळे, डॉ.सतिष फाटके, डॉ.चंद्रकांत कदम, डॉ.सुनिल जाधव, डॉ.प्रमोद जगताप, डॉ.प्रणाली त्रिमुखे, डॉ.प्रदीप जैस्वाल या तज्ञ डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून केडगाव येथे सुरु केलेले राजमाता कोविड सेंटर मधून बरे होऊन रुग्ण घरी परतत आहे.  

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News