राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी अख्तर शेख यांची नियुक्ती.


राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी अख्तर शेख यांची नियुक्ती.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२३: राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी श्रीगोंदयाचे माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष अ.गफ्फार शेख यांनी दिले.

अख्तर शेख हे राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जातात सलग १५ वर्षे त्यांनीश्रीगोंदा नगर परिषदेचे नगरसेवक व ५ वर्षे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. शेख हे राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून एकनिष्ठ आहेत.२०१५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी पक्ष सोडून गट स्थापन केला परंतु  अख्तर शेख राष्ट्रवादीतच राहिले.पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी त्यांना दिली आहे.

नूतन प्रदेश सचिव अख्तर शेख यांचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, ना. नबाब मलिक,  आ. अरुणकाका जगताप,आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके,आमदार संग्राम जगताप,माजी आमदार राहुल जगताप,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार, राजेंद्र फाळके,हरिदास शिर्के यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News