जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संचालक पानसरे यांचा केला सत्कार.


जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संचालक पानसरे यांचा केला सत्कार.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२३:  अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने यावर्षी कर्मचाऱ्यांना खूष करत २४ टक्के बोनस व कोरोना महामारीत विमा पॉलिसीचा स्तुत्य  निर्णय घेतल्यामूळे श्रीगोंदा तालुका बँक सेवकांच्यावतीने जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांचा बँकेचे तालुका विकास अधिकारी वसंतराव जगताप यांच्या हस्ते सन्मान करून आभार व्यक्त केले.

           याप्रसंगी बोलताना बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी बँकेच्या सर्व सेवकांचे कामकाज कौतुकास्पद आहे. व बँक सेवकांनी केलेल्या कामकाजाबाबत सर्वांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या हिताचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असल्याचे सांगितले व बँक सेवकांच्या कामकाजाचे कौतुक केले.  यापुढेही बँक सेवकांनी संचालक मंडळाच्या निर्णयाचे तळागाळातील शेतकरी सभासदांपर्यंत पोहचवून अंमलबजावणी करावी अशी सूचना वजा विनंती उपस्थित सेवकांना पानसरे यांनी केली आहे.

>          यावेळी बँकेचे तालुका विकास अधिकारी वसंतराव जगताप यांनी बँकेचे चेअरमन सीताराम गायकर पाटील , व्हा.चेअरमन रामदास वाघ , जेष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले , संचालक दत्तात्रय पानसरे , तसेच सर्व संचालक मंडळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे यांनी सेवकांचे हिताचे निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. एस. एस. पाचपुते, सचिव संघटनेचे अध्यक्ष नीलेश पवार, बी. ए कुलकर्णी, शाखाधिकारी बी. आर. जामदार, पी.बी. व्यवहारे, तालुक्यातील सर्व बँक शाखांचे शाखाधिकारी व इस्पेक्टर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News