नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी देणार ! सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही


नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी देणार ! सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्यापुढे अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाची व्यथा मांडताना आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी                        अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाची दुरावस्था होऊन अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून मोठ्याप्रमाणात होत असलेल्या पावसामुळे रस्त्याची वाताहत होवून हा महामार्ग अक्षरशः मृत्यचा सापळा झाला आहे.या राज्यमार्गाची वेळेत दुरुस्ती झाली नाही तर अपघाताची संख्या वाढून अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो त्यासाठी या राज्य मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती होणे गरजेचे आहे.अशा प्रकारे अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाची खड्ड्यांमुळे झालेली वास्तव परिस्थिती आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपुढे मांडली असता त्याची दखल घेऊन या राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी रूपये निधी देणार व मजबुतीकरण व नूतनीकरणासाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे.

               अहमदनगर-मनमाड  या राज्यमार्गाच्या दुरुस्ती संदर्भात मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या दालनात बुधवार (दि,२३) रोजी बैठक पार पडली. या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाची झालेली दुरावस्था व तातडीने दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपुढे मांडून रस्त्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली. कोपरगाव तालुक्याच्या शेजारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी धार्मिक स्थळ आहे. शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर वाहनांची संख्या जास्त आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाण्यास विलंब होत असून अनेक गंभीर रुग्णांनी रस्त्यातच आपले प्राण सोडले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांना सांगितले. तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर पुणतांबा फाटा चौफुली व साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे सातत्याने मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच याठिकाणी शाळा-महाविद्यालये, औद्योगिक वसाहत,रेल्वे स्टेशन रोड, कारखाना परिसर व कोपरगाव शहरात प्रवेश करण्यासाठी महत्वाचा मार्ग असल्यामुळे या ठिकाणी होत असलेल्या वाहन कोंडीमुळे अनेक पादचाऱ्यांना व दुचाकी स्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. त्यामुळे या राज्यमार्गाची दुरुस्ती करतांना पुणतांबा फाटा चौफुली येथे उड्डाणपूल करण्यात यावा. तसेच बेट नाका,श्री.संत जनार्दन स्वामी आश्रम येथे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात यावा. येवला नाका व श्री साईबाबा कॉर्नर येथील वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या आणि सदर मार्गावर गरजेच्या ठिकाणी सेवा मार्ग (सर्व्हिस रोड) काढण्यात यावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली. त्याबाबत आपण लवकरच निर्णय घेवू असे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.जाहिरात
Search
विडिओ
Recent News