डाऊच खुर्द येथेअतिवृष्टी काळात आपतग्रस्तांना जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुलकडुन निवाऱ्याची सोय ! !


डाऊच खुर्द येथेअतिवृष्टी काळात आपतग्रस्तांना जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुलकडुन निवाऱ्याची सोय ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

मागील काही दिवसापासुन परतीच्या प्रवासात पावसाने कोपरगाव तालुक्यात धुमाकुळ घातला असुन मागील काही दिवसापासुन चांदेकसारे डाउच खुर्द व जेऊर कुंभारी भागात अतिवृष्टी होत आहे,मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर झालेच त्याच बरोबर नागरिकाचे अतोनात हाल होत आहे. या पाश्र्वभूमीवर डाउच खुर्द येथील वैभवनगर परिसरातील नाल्याला पुरआल्यामुळे शेजारी असलेल्या वस्तीतील घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तू भिजल्या व रात्री झोपायला जागा उरली नव्हती हि गोष्ट जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष श्री भास्करराव होन व सचिव श्री सुनिल होन यांना समजताच त्यांनी तात्काळ आपतग्रस्त नागरिकासाठी जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल च्या खोल्या निवाऱ्यासाठी खुल्या करून दिल्या.त्यामुळे नागरिकांना आसरा मिळाला, शिक्षणातच नव्हे तर सामाजिक कार्यात ही जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूलने आपले योगदान देत सर्वांपुढे एक नविन आदर्श निर्माण केल्याचे स्कूल चे मॅनेजिंग डायरेक्टर सागर भास्करराव होन यांनी या वेळी सांगितले,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News