राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीसपदी भाऊसाहेब उडाणशिवे


राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीसपदी भाऊसाहेब उडाणशिवे

नगर - (प्रतिनिधी संजय सावंत) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस म्हणून माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आशयाचे पत्र विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नेटके यांनी श्री.उडाणशिवे यांना प्रदान केले आहे.

श्री. उडाणशिवे हे मूळचे पोतराज. 1986 ला प्रथम नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडून आले, त्यानंतर 2003 ला महापालिकेत तर पत्नी सौ.गिरीजाबाई उडाणशिवे दोन वेळा नगरसेविका होत्या. शहरातील सर्व झोपडपट्टयांतील प्रश्न त्यांनी सातत्याने शासन दरबारी संबंधितांकडे मांडले. काच-कागद-कचरा वेचक संघटना, शाहीर परिषद, महाराष्ट्र शासनाच्या कलावंत मानधन समितीवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. पोतराज यांची संघटनाही त्यांनी स्थापन केली आहे. पोतराज नृत्यसह मराठी लोककलेचे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळविली आहे. नगर व पुणे आकाशवाणीवरही त्यांची कला सादर आहे.

कलेच्या माध्यमातून लोकशिक्षण देण्याचा आपला प्रयत्न यापुढेही या नव्या विभागाच्या माध्यमातून सुरु ठेवून पक्षाचे ध्येय धोरण शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम प्रभाविपणे करुन शेवटच्या घटकांचे प्रलंबित प्रश्नही शासन दरबारी मांडू असे श्री. उडाणशिवे यांनी पद स्विकारतांना सांगितले.

या नियुक्तीबद्दल त्यांचे आ.अरुणकाका जगताप, आ.संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, प्रा.माणिकराव विधाते आदिंनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News