महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका कोरोना मुक्तीसाठी विशेष योजना गावोगावी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान


महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका कोरोना मुक्तीसाठी विशेष योजना गावोगावी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान

शिर्डी राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी

दि.23 :  कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत संपूर्ण संगमनेर तालुका कोरोनामुक्तीसाठी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात वाडी वस्तीवर "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या अभियानासह विविध प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असल्याची माहिती भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. तसेच तालुक्यातील कोरोना परिस्थिती, कोविड सेंटर, औषधोपचार याबाबत दररोज आढावा घेवून मंत्रीमहोदय प्रशासनाला सूचना करत आहे.

            मागील सहा महिन्यांपासून जगात व राज्यात आलेल्या मानव जातीवरील कोरोनाचे संकट पूर्णपणे नष्ट करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन काम करत आहे. संगमनेर तालुक्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी कोरोनाची साखळी संपुष्टात आणण्यासाठी थ्री टी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली होती. यामध्ये ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट करण्यात आल्या. संगमनेर तालुका जिल्ह्यात रॅपिड टेस्ट करणारा पहिला ठरला. याचबरोबर प्रशासनाला अमृत उद्योग समूहाने सामाजिक जाणिवेने मदत केली. अमृतवाहिनीचे हॉस्टेल तसेच थोरात कारखान्याच्यावतीने वसंत लॉन्स येथे अद्ययावत 300 बेडचे कोविड सेंटर सुरु केले. यामध्ये दोन वेळचे, नास्ता, चहा, जेवण,औषधोपचार यांसह आधुनिक सुविधा पुरविल्या जात आहे. या कोविड सेंटरचे नागरिकांमधून कौतूक होत आहे. तसेच शासनाचे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान गावागावात राबविले जात आहे. या अभियानात जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, ग्रामपंचायत वार्डनिहाय काम सुरु आहे. देवकौठे ते बोटा असा 100 किमी लांबीचा विस्तीर्ण असलेल्या तालुक्यात गावोगावी व वाडीवस्तीवर हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. यामध्ये  प्रत्येक व्यक्तीचे तापमान, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जात आहे. शहरात नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरु आहे.           कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे गरजचे आहे. काही लक्षणे आढळल्यास जवळच्या दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ.सचिन बांगर, डॉ.सुरेश घोलप, डॉ.सदिप कचोरिया यांनी केले आहे.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News