अहमदनगर जिल्हा काॅग्रेस कमिटी अ.जा.विभागाची कोपरगांव येथे बैठक संपन्न !! रविंद्र साबळे यांची कोपरगांव शहराध्यक्षपदी निवड !!


अहमदनगर जिल्हा काॅग्रेस कमिटी अ.जा.विभागाची कोपरगांव येथे बैठक संपन्न !! रविंद्र साबळे यांची कोपरगांव शहराध्यक्षपदी निवड !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीचे अनुसुचित जातीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उर्जा मंत्री डाॅ.नितीन राउत,महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी जातीय विभागाचे विजय अंबोरे यांच्या नेतृत्तवाखाली कोपरगांव येथे गाव तेथे शाखा अभियानाची चौथ्या टप्प्यातील महत्वपूर्ण बैठक प्रदेश समन्वय बंटीभाउ यादव, शिवाजीराजे जगताप समन्वय, अहमदनगर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे,काॅग्रेसचे ज्येष्ठनेतेअशोकराव खांबेकर, मनोहर बिडवे जिल्हा उपाध्यक्ष, विजय आढाव सचिव अहमदनगर जिल्हा,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. 

यावेळी बंटी यादव म्हणाले की, गाव तेथे शाखा बाळासाहेब थोरातांच्या व अंबोरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सक्षमपणे, यशस्वीपणे हा पॅटर्न आम्ही राबविणार आहोत.अहदमनगर जिल्हयामध्ये प्रत्येक गावात शाखा उभी राहिल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. काॅग्रेस हा बहुजनांचा पक्ष असुन तळागाळातील शोषित पिढीत लोकांना सोबत घेवुन जाणारा पक्ष आहे. सत्तेच्या माध्यमातुन प्रत्येक गोर गरिब जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ आम्ही मिळवुन देणार आहोत असे आव्हान त्यांनी केले.यावेळी विविध पदाधिका-यांच्या निवड करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने आदित्य काॅम्युटर एज्युकेशनचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साबळे यांची कोपरगांव शहराध्यक्षपदी तर चंद्रकांत बागुल तालुकाअध्यक्ष, कार्यअध्यक्ष यादवराव त्रिभुवन,तालुका सचिव ज्ञानेश्वर भगत यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी युवा जिल्हाध्यक्ष आर.पी.आय. उमेश शेजवळ,सचिन बोरणे तालुकाध्यक्ष श्रीरामपुर,कांबळे नेवासा तालुकाध्यक्ष,बाळासाहेब पगारे राहता तालुकाध्यक्ष युसुफ शेख पी.आर.पी.शहरअध्यक्ष, बाळासाहेब दिघे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News