दौंडकरानो सावधान दोन दिवसात 22 रुग्ण,परिसरात 35 जण कोरोना बाधीत, शासनाचे नियम पाळा, कोरोना टाळा


दौंडकरानो सावधान दोन दिवसात 22 रुग्ण,परिसरात 35 जण कोरोना बाधीत, शासनाचे नियम पाळा, कोरोना टाळा

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरासह परिसरात 35 कोरोना रुग्ण आढळले आहेत,22 तारखेला दौंड उपजिल्हा रुग्णालयात 96 लोकांची तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये 18 जण बाधीत आले होते,गोपाळवाडी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत 34 लोकांची तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये तीन पुरुष कोरोना बाधीत आले होते,तर 23 तारखेला 70 लोकांचे अँटीजेन तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये 12 जण पोझिटीव आले आहेत असे एकूण दोन दिवसात 200 लोकांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये 35 लोक कोरोना बाधीत असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे. दिनांक 22/9/20 मंगळवार  रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 96 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले,पैकी एकूण 18 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 78 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 4

पुरूष --14,प्रभाग -दौंड शहर=14,इतर ग्रामीण=1

गोपाळवाडी=2,सैनिक नगर 1,लींगाळी 1,Srpf=2

 22 ते  60 वर्ष वयोगटातील आहेत. आज बुधवार दिनांक 23/9/20 रोजी 70 लोकांची 

रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये 14 व्यक्ती कोरोना बाधीत आहेत 8 महिला,6 पुरुष आहेत त्यामध्ये 2   वर्षाच्या बाळापासून ते 42 वर्षा पर्यंतचे व्यक्ती आहेत. ग्रामीण 5 दौंड शहर 9, गिरिम 1,दत्तनगर 2, पंचशील थीयटर 3, पानसरे वस्ती 1,वरदविनायक 2,शिवाजी चौक 1, ख्वाजा वस्ती 1, इतर 2 SRPF-7, मधील 1रुग्ण आढळले आहेत अशी माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.दौंड शहरात रुग्ण संख्या वाढतच चालली आहे त्यामुळे व्यवसायिकांनी सावधानता बाळगावी,प्रशासनाचे लोक तुम्हाला ओळखतात, परंतू कोरोना तुम्हाला ओळखत नाही,तो कुठून कसा, कोणा बरोबर येईल सांगता येत नाही,शासनाने दिलेले सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली जबाबदारी पार पाडावी,आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी ही स्वतः पासून सुरु करुन शासनाला सहकार्य करावे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News