दोन गावांना जोडणारा शिवरस्ता तहसीलदारांच्या आदेशाने झाला सुरू, पाटस मंडलाधिकारी आणि पोलीस यांनी केली कारवाई


दोन गावांना जोडणारा  शिवरस्ता तहसीलदारांच्या आदेशाने झाला सुरू, पाटस मंडलाधिकारी आणि पोलीस यांनी केली कारवाई

विठ्ठल होले पुणे

पाटस प्रतिनिधी --- कुरकुंभ MIDC मधील रिलायन्स कंपनी जवळून पाटस- पांढरेवाडी या दोन गावांना जोडणारा दक्षिणोत्तर असा शिवेचा रस्ता गेलेला आहे,त्या शिवेच्या लगत असणाऱ्या पाटस हद्दीतील  गट नंबर १३५ मधील शेतक-यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून अडथळा निर्माण केला होता, त्यामुळे रिलायन्स कंपनी कडे येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता,त्या रस्त्यावर रिलायन्स कंपनी स्वखर्चाने मुरुम टाकत होती तर हे शेतकरी मुरुम टाकून देत नव्हते,म्हणून कंपनीने तहसिलदार सो. दौंड यांचेकडे तक्रार केली होती,त्यावर  तहसिलदार दौंड यांनी पाटस विभागाचे मंडल अधिकारी श्री. राजेंद्र म्हस्के यांना तातडीने शिवेचा रस्ता खुला करून देणेचा व रस्त्यावर कंपनी मार्फत मुरुम टाकून घेणेचा लेखी आदेश दिला,त्यानुसार पाटस मंडल अधिकारी हे पोलीस बंदोबस्तासह  दिनांक--२२/९/२०२० रोजी सकाळी ११ वाजता अडविलेला शिवेचा रस्ता खुला करुन देणेसाठी गेले असता शिवे लगतच्या पाटस हद्दीतील गट नंबर १३५ च्या जमीन मालकांनी त्यांचे कुटुंबासह रस्त्यावर येवून मुरुम टाकणेस अडथळा निर्माण केला, त्या कुटुंबाला मंडलाधिकारी म्हस्के आणि पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी समजून सांगण्याच्या प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकले नाही म्हणून  पाटस विभागाचे मंडल अधिकारी यांनी  सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून त्यांचेवर IPC 353 नुसार गुन्हा दाखल करणेसाठी पोलीस यंत्रणेसह पाटस पोलीस स्टेशनला आले आणि गुन्हा दाखल करु लागले,त्यावेळी अडथळा आणणाऱ्या व्यक्तींनी स्वत: होवून रस्त्याचे  कामात आम्ही पुन्हा अडथळा निर्माण करणार नाही अशी  माफी मागितली व आमचेवर गुन्हा दाखल करु नका अशी विनवणी केली.. तेव्हा  मंडल अधिकारी यांनी त्यांची विनंती मान्य करून दाखल करीत असलेला गुन्हा मागे घेतला आणि आम्ही पुन्हा रस्त्यावर अडथळा निर्माण करणार नाही असा त्या सर्वांचा मंडल अधिकारी पाटस व पोलीस उप निरीक्षक, पाटस औट पोस्ट यांचे समोर लेखी जबाब घेतला आणि पुन्हा त्याठिकाणी परत जावून रस्त्यावर मुरुम टाकून कामकाज सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News