ग. र. औताडे विद्यालयात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी !!


ग. र. औताडे विद्यालयात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे ग र औताडे पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या व आदर्श असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यापर्यंत गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचविणारे आधुनिक भगीरथ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133 आवी जयंती covid-19 प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टिगशनचे नियम पाळून मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली

 सदर कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.श्री.एम टी रोहमारे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मा. दिलीपराव औताडे विद्यालयाचे प्राचार्य श्री काकासाहेब गवळी यांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री काकासाहेब गवळी यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवन कार्याबाबत सर्व सेवकांना व उपस्थितांना माहिती दिली.त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवन परिचय सर्व विद्यार्थ्यांना माहिती व्हावा यासाठी ऑनलाइन पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे शिक्षकांना सुचविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री डहाळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक माननीय श्री बांगर सर यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News