कर्मवीर भाऊराव पाटील यांना आ. आशुतोष काळेंनी केले अभिवादन


कर्मवीर भाऊराव पाटील यांना आ. आशुतोष काळेंनी केले अभिवादन

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना आ,आशुतोष काळे समवेत संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणाचे महामेरू कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील के.बी.पी. विद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारांनी प्रेरित होऊन रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी मोलाचे योगदान दिले असून माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील तीच परंपरा पुढे सुरु ठेवली.रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी माझ्यावर सोपविलेली संस्थेच्या उत्तर विभागाची जबाबदारी पार पाडतांना संस्थेच्या प्रगतीसाठी आदरणीय पवार साहेबांना अपेक्षित असलेली आदर्शवत कामगिरी करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

              याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य शंकरराव थोपटे,के.बी.पी.विद्यालयाचे प्राचार्य विश्वास काकळीज, सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सुरवसे, दरेकर,आप्पासाहेब आव्हाड,रयत बँकेच्या संचालिका सुनीताताई वाबळे,संतोष पेटकर,  बाळासाहेब निर्मळ,काशीनाथ लव्हाटे,नरेंद्र ठाकरे,शहाजी सातव आदी उपस्थित होते.


              

जाहिरात
Search
विडिओ
Recent News