माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत गोपाळवाडी येथे आरोग्य विभागाकडून रॅपिड अँटीटिजेन तपासणी 3 जण पोझिटीव


माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत गोपाळवाडी येथे आरोग्य विभागाकडून रॅपिड अँटीटिजेन तपासणी 3 जण पोझिटीव

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी ---- दौंड येथील गोपाळवाडी येथे ग्रामपंचायत गोपाळवाडी आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अँटीजेन चाचणी घेण्यात आली,घरोघरी जाऊन आशा सेविका,आरोग्य सेविका, मदतनीस यांनी प्रत्येक व्यक्तीची ओक्सिजन आणि टेमप्रेचर तपासून ज्या व्यक्तीस थंडी,ताप,अंगदुखी,जिभेची चव जाणे अशी लक्षणे असणाऱ्यांना प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथे पाठविण्यात आले, आरोग्य विभाग यांच्या मार्फत अँटीजेन चाचणी घेण्यात आली,उपकेंद्राच्या डॉक्टर पिरजादे यांनी ओपिडी घेऊन 47 जणांची तपासणी केली त्यामध्ये पोझिटीव रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 34 जणांची अँटीजेन चाचणी घेण्यात आली त्यापैकी तीन व्यक्ती पोझीटीव आले आहेत,त्यांना मदरसा कोविड सेंटर येथे आरोग्य विभागाची गाडी बोलवून पाठविण्यात आले आहे.डॉ राजेश पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ पिरजादे,आरोग्य सेविका शिंदे आरोग्य सेवक पोळ, अंगणवाडी सेविका, आशा सेविका,कुरकुंभ येथील आरोग्य सेविका  यांनी काम पाहिले तर पंचायत समिती सदस्य विकास कदम, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले,पोलीस पाटील वर्षाताई लोणकर,ग्रामसेविका स्वाती लामकाने,सुखदेव सुळ,अनिल होले, पपू होले,कल्पेश लांडगे,संतोष होले यांनी सहकार्य केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News