"करिअर निवडताना" विषयावर बुधवारी ऑनलाईन मार्गदर्शन


"करिअर निवडताना" विषयावर बुधवारी ऑनलाईन मार्गदर्शन

 शिर्डी ,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी, अहमदनगर 22 सप्‍टेंबर - जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयामार्फत दिनांक 23 सप्‍टेंबर 2020 रोजी "करिअर निवडतांना" या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे. अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथील प्राध्‍यापक प्रितमकुमार बेदरकर, यांचे मोफत मार्गदर्शन दिनांक 23 सप्‍टेंबर 2020 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आयोजित केले आहे. त्‍याबाबतची लिंक https://meet.google.com/wdr-vmbu-dps ही आहे. तरी जिल्‍ह्यातील युवक-युवतींनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन वि.जा. मुकणे, सहायक आयुक्‍त कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता, अहमदनगर यांनी केले आहे.  ****

जाहिरात
Search
विडिओ
Recent News