शिर्डी, राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी अहमदनगर 22 सप्टेंबर - केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारांतील "खिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा" दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळ्या राज्य शासनाच्या वतीने त्या त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धांसाठी विविध खेळ प्रकारांतील महाराष्ट्र शासनाच्या संघ, निवड चाचणी घेऊन, स्पर्धांसाठी पाठविले जातात. विविध विभागाच्या कार्यालयात कार्यरत असलेले खेळाडु / नियमित कर्मचा-यांना कळविण्यात येत आहे की दरवर्षीप्रमाणे आखिल भारतीय नागरी सेवा क्रिडा स्पर्धा आयोजन करण्यात येणार आहे. त्यात टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रीकेट, हॉलीबॉल, जलतरण, ब्रीज, कॅरम, बुध्दिबळ, अथेलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्टत्व, कुस्ती, लॉनटेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळांचे क्रीडा स्पर्धा आयोजन होणार आहे. तरी सदर क्रीडा स्पर्धेचे आवेदन पत्र विहित नमुन्यात कार्यालय प्रमुखांच्या शिफारशीसह द्विप्रतीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे दि. 3 नोव्हेंबर 2020 पर्यंत सादर करण्यात यावे, असे आवाहन शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे. *****