अर्बन बँक कर्मचाऱ्यावर दहशत कायम -राजेंद्र गांधी


अर्बन बँक कर्मचाऱ्यावर दहशत कायम -राजेंद्र गांधी

वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्या समोर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी पत्रकारांशी बोलताना.  

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) नगर अरबन बँक हि ११० वर्ष परंपरा लाभलेली वैभवशाली बँक आहे.परंतु सध्याचे चेअरमन व माजी खासदार दिलीप गांधी हे भ्रस्टाचार करून बँकेचे वाटोळे करीत आहेत.मी सातत्याने पाठपुरावा करून बोगस कर्जदाराची माहिती मिळवली आहे.२०१७ साली आशुतोष लांडगे यांनी कर्ज थकीत असतानाही पुन्हा ३ कोटीचे कर्ज बँकेकडून घेतले आहे.३ते४ महिन्यापूर्वी आशुतोष लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा.हा ठराव झाला असून देखिलं त्यावर काही कारवाही झाली नाही.                                              

  वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्याचे दर्शन घेऊन राजेंद्र गांधी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आशुतोष लांडगे उपस्थित नव्हते.राजेंद्र गांधी म्हणाले कि,आशुतोष लांडगे यांनी केलेले खोटे आरोप जनतेसमोर आणण्यासाठी मी आज महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आलो आहे.विरोधक सत्याच्या बाजूने नाही म्हणून आज येथे चर्चा करण्यास आले नाही.दिलीप गांधींना गैर कारभारामुळे ऑगष्ट २०१९ मध्ये रिजर्व बँकेनं चेअरमन व संचालक मंडळ बडतर्फ केले व बँकेवर प्रशासक आले असतानाही कर्मचाऱ्यांवर दहशत कायम रहावी.म्हणून नगर अर्बन बंकेच्या माजी संचालकाला बँकेतच  मारहाण करण्यात आली.याचाच अर्थ असा होतो कि बँकेच्या कर्मचाऱ्यावर दहशत कायम करून वसुली होऊ नये.या सर्व प्रकरणात विद्यमान चेअरमन, माजी खासदार दिलीप गांधी यांचा राजकीय वरदहस्त आहे.माझ्यावर खोटे आरोप करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.परंतु मी सत्याचा मार्ग सोडणार नाही व हा लढा पुढे चालू ठेवणार आहे असे अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले.याप्रसंगी सोसिअल डिस्टन्स चे पालन करण्यात आले.                       

जाहिरात
Search
विडिओ
Recent News