मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत देऊन आरोग्य विमा उतरावा !!


मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत देऊन आरोग्य विमा उतरावा !!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मागणी !

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलेला शब्द पूर्ण करावा. 

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगांव - राज्यात कोरोना आजाराने उग्ररुप धारण केले आहे. सर्व सामान्यांसह माध्यम क्षेत्र देखील त्यापासुन अलिप्त राहिलेले नाही.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना शासनाने घोषणा केल्याप्रमाणे 50 लाखंाची मदत द्यावी त्याचबरोबर राज्यातील सर्व पत्रकारांचे ओराग्य विमा उतरावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीेने मुख्यमंत्री, तहसिलदार, जिल्हाधिकारी, आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.  

महाराष्ट्रात कोरोना काळात पत्रकारांचा मृत्यू झाला तर त्यांनाही आरोग्य व पोलिस कर्मचा-यांप्रमाणे पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत पत्रकारांच्या कुटुंबियांनाही मदत केली जाईल अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत दि. 3 जून रोजी केली. मात्र तीन महिने लोटले तरी सरकारी आदेश काढला नाही, पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबतचा निर्णय पुढील कॅबीनेटमध्ये घेतला जाईल असा स्पष्ट केले होते. या गोष्टीलाही पंधरा ते वीस दिवस झाले तरी निर्णय अद्याप झालेला नसुन तो निर्णय तातडीने घेण्यात यावा तसेच संतोष पवार, पांडुरंग रायकर असे पत्रकारांना योग्य तो उपचार न मिळाल्याने यांचा मृत्यू झाला पुन्हा अशी वेळ कोणत्याही पत्रकारांवर येऊ नये यासाठी पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी आणि त्या संबंधीचा अध्यादेश लगेच काढला जावा. अडचणीत आलेले माध्यम क्षेत्र आणि असंख्य पत्रकारांवर आलेली बेकारीची वेळ लक्षात घेऊन वरील सर्व मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने कोपरगांव तहसिलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मनिष जाधव,जनार्दन जगताप तालुका उपाध्यक्ष,शहराध्यक्ष हाफीजभाई शेख,विनोद जवरे, विजय कापसे,अक्षय काळे, राजेंद्र जाधव,शिवाजी जाधव, लक्ष्मण जावळे,फकिरराव टेके, अमोल गायकवाड,रविंद्र जगताप, गहिनाथ घुले,योगेश गायके, संजय भवर,अनिल दिक्षीत, सुमित थोरात,रविंद्र साबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News