शेतकरी कर्जमाफी नंतर बँकांनी ज्यादा घेतलेले कर्जावरील व्याज परत करण्यासाठी युवासेनेने केलेले आंदोलन यशस्वी!


शेतकरी कर्जमाफी नंतर बँकांनी ज्यादा घेतलेले कर्जावरील व्याज परत करण्यासाठी युवासेनेने केलेले आंदोलन यशस्वी!

विठ्ठल होले पुणे

 इंदापूर प्रतिनिधी --- महाराष्ट्राचे     मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आघाडी सरकारने दोन लाख रुपये पर्यंतची  शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन देखील जिल्हा मध्यवर्ती बँकांनी,  विविध कार्यकारी संस्थांनी  शेतकऱ्यांकडून ज्यादा व्याजाची आकारणी करून त्यांची फसवणूक करून लूट केली अशा शेतकऱ्यांचे घेतलेले नियमबाह्य व्याज त्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत इंदापूर युवासेनेच्या वतीने मा. सुरज सानप(युवासेना जिल्हा सरचिटणीस) यांच्या मार्फत एक दिवशी लाक्षणिक उपोषण सुरू असताना दुपारी ३.३० वाजता  मा सहाय्यक निबंधक गावडे साहेब यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे इंदापूर शाखेचे विभागीय अधिकारी थोरात साहेब, अमोल अर्जुन साहेब वसुली अधिकारी, बी एच बंडगर साहेब सहकारी अधिकारी श्रेणी-2 यांच्यासमवेत येऊन भेट देऊन जा  क्र ससनिइं/कक्ष-४/सुतु सानप/निवेदन/७२५/सन२०२०  या पत्रानुसार विभागीय विकास अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या इंदापूर तालुका इंदापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत बँकेने संस्थेला आकारणी केलेले व्याज संस्था चालू खाते जमा दिले आहे व संस्थांनी शेतकऱ्यांना आकारलेले व्याज शेतकऱ्यांच्या बचत खाते जमा करणे बाबत संस्थांना सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे बहुतांशी ६० ते ७० टक्के संस्थांनी शेतकऱ्यांना आकारलेल्या व्याजाची रक्कम त्यांच्या बचत खाती जमा दिलेली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या व्याजाच्या रकमेचा जमाखर्च लवकरात लवकर करणेबाबत संस्थांना सूचना दिलेल्या आहेत असे या कार्यालयात  संदर्भ क्र ४ विभागीय विकास अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या इंदापूर तालुका इंदापूर कळवलेले आहे. 

या कार्यालयाकडून आपले संदर्भीय नियोजनावर मुक्त प्रमाणे कार्यवाही चालू आहे तरी आपण उपोषण सारख्या कृत्यापासुन परावृत्त व्हावे हे आपणास कळविण्यात येत आहे. असे लेखी पत्र दिले. त्यास मान देऊन मी आजचे उपोषण स्थगित केले. 

 प्रसंगी मा.शरदचंद्र सुर्यवंशी (शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक) , मा. सुरज सानप (युवासेना पुणे जिल्हा सरचिटणीस),मा.कुलदीप निबांळकर (उपजिल्हा युवा अधिकारी), सचिन इंगळे (तालुका युवाअधिकारी),लक्ष्मण अजबे (युवासेना तालुका सरचिटणीस ),नवनाथ सुतार ( उपतालुका युवाअधिकारी ),अनिल सुर्यवंशी (तालुका विभाग युवाअधिकारी ),निखिल देवकर (विभाग युवाअधिकारी),बाळासाहेब नलवडे,विनायक लोंढे( उपशहर युवा अधिकारी ),प्रतिक रायते (शाखाअधिकारी सणसर)  रोहन सोनवणे, सदानंद वाघमोडे ( विभाग युवा अधिकारी),योगेश हरिहर (विभाग युवा अधिकारी) सनी हरिहर,सोमनाथ भगत, अक्षय गुळीक आदी युवा सैनिक उपस्थित होते. सदरच्या उपोषणास विविध सामाजिक- राजकीय मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News