कोरोना वर मात करण्यासाठी दौंड तालुक्यात एकवटले तरुण!! प्लाजमा दान करण्याचे केलेले आवाहन


कोरोना वर मात करण्यासाठी दौंड तालुक्यात एकवटले तरुण!! प्लाजमा दान करण्याचे केलेले आवाहन

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- पलास्मा डोनर ग्रुप दौंड , कोविड हेल्प सेंटर , भारतीय जैन संघटना च्या माध्यमातून यामध्ये काम करीत असताना एकमेकाची ओळख नसतानाही मदत करण्याचा प्रयत्न या ग्रुप वर आहे या ग्रुप चे काम सर्व व्हाट्सअप मेसेज वर चालते व्हाट्सअप  ग्रुप रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत करत आहे

यामध्ये प्रामुख्याने

श्री रमेश जी राठोड.

श्री हर्षल भटेवरा (राहू)  

श्री जयेश ओसवाल 

श्री प्रसाद मुनोत

श्री सौरभ भंडारी (दौंड

श्री मयुर सोळसकर (कासूर्डी)

श्री नितीन हेंद्रे 

श्री प्रमोद उबाळे (यवत) 

श्री संतोष जी कचरे (वरवंड) व 

सर्व तालुक्यातील आरोग्य सेवक

*करोना (COVID-19) व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध सापडलेलं नाही. परंतु, करोनाबाधित रुग्णांना बरं करण्यासाठी *प्लाझ्मा थेरेपी* *उपयोगी पडत असल्याचं समोर आलंय*.

अजून प्लाज्मा दान विषयी जनजागृती होणे खूप गरज आहे

ग्रुपने आत्तापर्यंत 72 लोकांना प्लाजमा मिळवून दिला आहे

13 पेशंटला ला बेड मिळवून देणे

24 पेशंटला रेमेडीसिवर इंजेक्शन्स मिळवून देण्यास मदत

गरीब व गरजू लोकांना मोफत रक्त मिळवून देणे

कोरोना संबंधी इतर काही औषधे ,रुग्णवाहिका लागल्यास उपलब्ध करून देणे समुपदेशन करणे  

रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताची गरज भागविणे अशा प्रकारचे कार्य करीत आहे

सदर ग्रुप मधे तालुक्यातील व्यापारी , सेवाभावी संस्था ,सरकारी व खासगी डॉक्टर , फार्मासिस्ट ,पोलीस , सर्व पत्रकार , प्रशासन , नेते मंडळी, नोकरदार वर्ग व इतरही व्यस्त कार्यकर्ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून दौंड तालुक्यामध्ये व जिल्ह्यांमध्येही करोणा ग्रस्तांना व नातेवाईकांना मदतीचा हात देत आहे व अजून पुढे चालू राहील..

आमच्या ग्रुप तर्फे आवाहन करण्यात येते की *आपण करोना आजारातून बरे झाला आहात, त्यामुळे तुमच्या शरीरात कोविडशी लढणाऱ्या Anti-Bodies(प्रतिपिंडे) तयार झाली आहेत. प्लाझ्मा थेरपीद्वारा ह्या* *Anti-Bodies(प्रतिपिंडे) इतरांना दान करून तुम्ही एखाद्याला जीवनदान देऊ शकता असे आवाहन या तरुणांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News