माझे कुटुंब माझी जबाबदारी फिट अँड हेल्थ क्लब आणि कटारिया हॉस्पिटल यांच्या कडून पथ नाटयाद्वारे जनजागृती


माझे कुटुंब माझी जबाबदारी फिट अँड हेल्थ क्लब आणि कटारिया हॉस्पिटल यांच्या कडून पथ नाटयाद्वारे जनजागृती

विठ्ठल होले पुणे 

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरातील फिट अँड हेल्थ क्लब आणि कटारिया हॉस्पिटल यांच्या वतीने शहर आणि तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने केलेल्या आवाहनाला सुरुवात केली आहे, पथ नाट्य सादर करून कोरोना विषयी जनजागृती करीत आहेत. यावेळी लोकांना कोरॉना पासून वाचण्यासाठी शपथ दिली आहे, "भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे कुटुंब आहे,सध्या माझ्या देशावर कोरोनाचे संकट आहे,या संकटास हद्दपार करण्यासाठी शासनाच्या प्रत्येक सूचनांचे मी नियमित पालन करीन,माझ्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या डॉक्टर,पोलीस,आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करीन,मी सुरक्षित माझे कुटुंब सुरक्षित,माझे गाव सुरक्षित तर माझा देश सुरक्षित,म्हणूनच माझे कुटुंब माझी जबाबदारी",जय हिंद,जय महाराष्ट्र,भारत माता की जय अशी सर्वांना डॉ सुनिता कटारिया यांनी शपथ दिली,या जनजागृती मोहिमेत डॉक्टर,मेडिकल,व्यापारी,महिला पुरुष असे 30 जण हे स्तुत्य कार्य करीत आहेत, कोरोना पासून वाचण्यासाठी डिजिटल पेमेंट करा, मस्कचं वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये काळजी घ्यावी,रोज सकाळी योगा करा,प्राणायाम करावा, अशी लोकांच्या उपयुक्त माहिती या सर्वांनी या पथ नाट्याच्या माध्यमातून जनतेला फिट अँड हेल्थ क्लब आणि कटारिया हॉस्पिटल यांच्या कडून दिली जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News