1लाख 85हजार 80 रुपयाचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत)
अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिह व अप्पर पोलीस अधीक्षक .सागर पाटील यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली दि.20/09/2020 रोजी गाडीलकर वीटभट्टी शेजारी बांबूच्या झोपडीच्या आडोशाला छापा टाकून रोख रक्कम,मोबाईल,मोटारसायकल व जुगार खेळण्याचे साधने असे एकूण 1 लाख 85हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले
वरील मुद्देमाल जप्त करून आरोपी
प्रशांत चंद्रकांत पवार,धनेश दिलीप चव्हाण ,गोरख रमेश गायकवाड,सुरेश शिवदास ननवरे ,लखन विठ्ठल कुसळकर ,अनिल वसंत फुलसौदर व दोन अज्ञात ईसम यांचे विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन येथे जुगार कायदा1887- कलम 12 (अ ),भारतीय दंड संहिता1860-चे कलम 188, 269,270, साथ रोग अधिनियम 1897- कलम 3,4 प्रमाणे गु.र.न.5969/2020 दाखल करण्यात आला आहे .
*सदरची कारवाई . पोलीस अधीक्षक अखिलेशकुंमार सिंह व अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशान्वये , उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे , आरसीपी पथकाचे कर्मचारी पोशि निलेश गुंजाळ ,पोशि राजू गाडे, पोशि गौतम सातपुते, पोशि विष्णु पाचपुते , यांनी सदरची कारवाई केली आहे*