गौतमनगर मधील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य शिवाजी विद्यालयाचा रस्ता हरवला चिखलात !!


गौतमनगर मधील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य शिवाजी विद्यालयाचा रस्ता हरवला चिखलात !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

सुरेगाव - कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातील कारखाना वसाहतीत मधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यामधील मुख्य रस्ता श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्यामुळे दोन चाकी वाहने सोडा परंतु पायी  चालणेही कठीण झाले असल्याने कामगार व नागरिकांना चिखलातून वाट काढावी  लागत असून हा रस्ता चिखलात हरवल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी कर्मवीर काळे कारखान्याचे  कार्यकारी संचालकांकडे केली आहे कर्मवीर काळे कारखाना आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा कारखाना आहे वसाहतीमधील रहिवासी व सुरेगाव ग्रामस्थ  दरवर्षी पावसाळ्यात महत्वाच्या असलेल्या खराब रस्त्यांमुळे त्रस्त होवून आपापसात संताप व्यक्त करीत असत.वारंवार कारखाना अधिकार्यांकडे तक्रारी करूनही या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे रस्त्यावरील  खड्डे मधील पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे अद्याप पर्यंत या रस्त्यावर कवडीचा खर्च केलेला नसल्याने रस्ता खचत चालला आहे 

यावर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणात  असल्यामुळे खड्याचे प्रमाण वाढत चालले आहे  व कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे यावर्षी नागरिक मुरुमासाठी खर्च करू शकत नसल्याचे मत सुरेगाव येथील ग्रामस्थ करत आहे सदरचा रस्ता हा पूर्णपणे खराब झाल्यामुळे दुचाकीस्वार तारेवरची कसरत करत असून पायी चालणार्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे याचा विशेष

त्रास जेष्ठ नागरिकांना व लहान मुलांना होत आहे. सुरु असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर नेहमीच सर्वत्र चिखल असल्यामुळे

दुचाकीचे अर्धेचाक या चिखलात फसत असून सर्वत्र दलदल असल्यामुळे भविष्यात काही दुर्दैवी घटना घडू शकतात त्या

घटनेची जबाबदारी कर्मवीर काळे कारखाना घेणार का? असा सवाल सुरेगाव ग्रामस्थांनी  कारखान्याला केला आहे.

-कोपरगाव तालुका व शहरातील रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला असून या निधीतून गौतमनगर कामगार वसाहत,सुरेगाव मधील रस्त्याची दुरस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व वाहनधारकामधून होत असून तात्पुरता स्वरूपात नागरिकांना दिलासा देण्यासाठी रस्त्यावर त्वरित मुरूम टाकून दुरूस्त करावा अशीहि मागणी होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News