वालचंदनगर पाटील वस्ती येथील घरातुन ३,१०,०००/- अवैध गांजा साठा जप्त- स्थानिक गुन्हे शाखा व वालचंदनगर पोलिसांची संयुक्त कारवाई.


वालचंदनगर पाटील वस्ती येथील घरातुन ३,१०,०००/- अवैध गांजा साठा जप्त- स्थानिक गुन्हे शाखा व वालचंदनगर पोलिसांची संयुक्त कारवाई.

विठ्ठल होले पुणे बारामती प्रतिनिधी --- एका गुन्हे गाराचा भाऊ आणि त्याचा मित्र दोघेजण गांजा विक्री करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बारामती विभागात पेट्रोलिंग करीत असताना विश्वासातील बातमीदार याचे कडुन बातमी मिळाली की, *देहूरोड पोलीस ठाणे कडील दाखल NDPS* गुन्ह्यातील अटक आरोपी नामे नितीन झेंडे याचा भाऊ शुभम झेंडे याने त्याचा मित्र आनंद गजघाटे रा.पाटील वस्ती वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे याचे  घरांमध्ये गांजा नावाचा अमली पदार्थाचा  साठा ठेवलेलाआहे सदर ठिकाणी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे स्टाफ सह जाऊन  छापा टाकला असता  त्या ठिकाणी *सुमारे दोन किलो वजनाचे खाकी रंगाचे १३ पुढे एकूण किंमत अंदाजे 3,10,000  रुपये किमतीचा गांजा  जप्त केला* असून पुढील कारवाई कामी वालचंद नगर पोस्टेचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

 सदरची कारवाई ही मा.श्री मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मा. श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग बारामती यांच्या आदेशान्वये मा. श्री पद्माकर घनवट सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक  स्थानीक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि/ दिलीप पवार वालचंदनगर पोस्टे, पोसई/अमोल गोरे स्था.गु. शाखा, पोहवा/ ज्ञानेश्वर क्षिरसागर,पोना/ गुरु गायकवाड, पो.ना/सुभाष राऊत,पोहवा/काशिनाथ राजापुरे,सर्व नेमणूक स्थागुशा पो.स.ई /जगताप,पो.ह.वा/सातव,पो. ह.वा/ शिंदे,पो.शि/कळसाईत, महिला पो शि/जामदार, वालचंदनगर पोस्टे यांचे पथकाने सदरची करवाई केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News