कोपरगावातील कोविड सेंटरसाठी आजी माजी आमदारांनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे !!अँड.नितीन पोळ


कोपरगावातील कोविड सेंटरसाठी आजी माजी आमदारांनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे !!अँड.नितीन पोळ

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

दिवसेंदिवस कोपरगाव तालुक्यात करोना साथीच्या आजाराचा कहर वाढत असून कोपरगाव तालुक्यातील कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजीवनी व कोळपेवाडी कारखान्याच्या माध्यमातून कोपरगाव च्या नागरिकांसाठी आजी, माजी आमदारांनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे 

आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की , करोना साथीच्या आजाराने कोपरगाव तालुक्यात डोके वर काढले आहे कोपरगाव शहरात तात्पुरता इलाज म्हणून एस एस जी एम कॉलेज व नुकतेच मूक बधिर विद्यालयात कोविड सेंटर ची उभारणी करण्यात आले आहे मात्र तालुक्यात व्हेंटिलेटर ची सुविधा उपलब्ध नाही उपलब्ध माहिती प्रमाणे आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये दोन व्हेंटिलेटर  उपलब्ध आहे या पेक्षा जास्त रुग्ण झाल्यास शिर्डी किंवा नगर शिवाय पर्याय उपलब्ध नाही करोना साथ रोखण्यात शासनाला पाहिजे तेवढे यश मिळत नाही या आधी कोपरगाव शहरात वेळेवर उपचार मिळाला नाही म्हणून पेशंट मयत झाले आहे

भारतात 48,000 व्हेंटिलेटर्स आहेत. WHO ने सांगितल्या नुसार 80 टक्के रुग्णांना हॉस्पिटल च्या उपचारांची गरज पडत नाही पण उरलेल्या 20 टक्के लोकांना ही गरज भासू शकते. म्हणून ज्या गतीने सध्या कोरोनाचा फैलाव होतोय त्यानुसार 48,000 हा आकडा अगदीच कमी आहे

शासकीय आकडेवारी असं सांगते की महाराष्ट्रात 3,363 व्हेंटिलेटर्स आहेत. त्यापैकी शासकीय रुग्णालयात 1143, 18 मेडिकल कॉलेजमध्ये 220 आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत 1000 रुग्णालयांमध्ये एकूण 2000 व्हेंटिलेटर्सची व्यवस्था सरकारने केली आहे. काही तज्ज्ञांच्या मते भारतात कोरोनाग्रस्तां ची संख्य 30 कोटी पर्यंत जाऊ शकते. त्यापैकी 40 ते 50 लाख लोकांची स्थिती गंभीर होऊ शकते."

याचाच अर्थ असा आहे की या लोकांना मेडिकल अटेंशन म्हणजेच इंटेसिव्ह केअर आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता लागू शकते. जर समजा अशी परिस्थिती उद्भवलीच तर भारताची आरोग्य सुविधांचा तुटवडा असेल तर परिस्थिती कशी येऊ शकते.हे सांगणे अवघड आहे 

कोपरगाव शहर व तालुक्यावर आपत्ती आल्यास कोळपेवाडी व संजीवनी या आजी माजी आमदार यांच्या ताब्यात असलेल्या संस्था सरकारच्या मदती आधी पुढे येतात या दोन्ही कारखाण्या कडून सरकार ला दर वर्षी कोट्यवधी चा महसूल दिला जातो मात्र करोना परिस्थिती सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही अशा वेळी आजी माजी आमदार यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर उभारलेल्या या संस्थांमधून व्हेंटिलेटर उपलब्ध करून घ्यावेत असे या पत्रकात म्हटले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News