श्रीगोंदा पोलिसांची कारवाई!! सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त


श्रीगोंदा पोलिसांची कारवाई!! सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

पाच लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त केले. यावेळी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,मा.पोनि. दौलतराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, मोटारसायकल चोरीच्या गुन्हातील आरोपी सुरेश देवराम गायकवाड वय ५२ वर्षे  रा. भिंगाण ता. श्रीगोंदा यास अटक करून दोन मोटारसायकल व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दोन मोबाईल असा सुमारे ५ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यात अनेक दिवसांपासून जबरी चोरी, घरफोडी, दरोडा यासह विविध गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र सानप यांनी याबाबत गुप्त खबऱ्यामार्फत सखोल चौकशी करून मौजे काष्टी, भोळेवस्ती श्रीगोंदा शहर, वडाळी, भनाळीवस्ती लोणी व्यंकनाथ, ढोकराई फाटा, याठिकाणी दोन मोबाईलसह सोन्याचांदीच्या चोरीच्या सुमारे ९ घटना तसेच सुरोडी व सिद्धटेक येथून दोन मोटारसायकल चोरी याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने तांत्रिक व गोपनीय पद्धतीने तपास करून यासर्व गुन्ह्यात फरारी असणारा आरोपी सुरेश देवराम गायकवाड रा. भिंगाण ता. श्रीगोंदा यास मूळ कामठी येथील राहणारा गायकवाड हा भानगाव येथील बापू गलांडे यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करत असल्याचा सुगावा पोलिसांना लागताच अतिशय शिताफीने त्याला अटक त्याच्याकडून दोन मोटारसायकल, दोन मोबाईल व सोन्या चांदीचे दागिने मिळून सुमारे ५ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती पत्रकार परिषदेत मा.उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,मा.पोनि. दौलतराव जाधव यांनी दिली. यावेळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप उपस्थित होते. सदराची कामगिरी पो.हे. कॉ अंकुश ढवळे, पो. कॉ. प्रकाश मांडगे, पो.कॉ .संजय काळे, पो.कॉ. गोकुळ इंगवले, पो.कॉ. योगेश सुपेकर, पो.कॉ. प्रताप देवकाते, पो.कॉ. प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.


 जाहिरात
Search
विडिओ
Recent News