माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत आरोग्य तपासणी - जि.प. सदस्य हनुमंत बंडगर


माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत आरोग्य तपासणी -  जि.प. सदस्य हनुमंत बंडगर

नानासाहेब मारकड भिगवण (प्रतिनिधी) "माझे कुटुंब माझी जबाबदारी" आरोग्य तपासणी अभियानात १४१ संशयीत रुग्ण आढळून आढळून आल्याची माहीती जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिली.

आज भिगवण येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान  राज्यमंत्री दत्तामामा भरणे, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शन खाली जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर यांनी सुरवात केली गावात 1576 कुटुंबातील 7316 नागरिकांचे सर्वेक्षण  पल्स ऑक्सिमिटर, टेम्प्रेचर गण च्या सहाय्याने  प्राथमिक आरोग्य केंद्र भिगवण व आशा तसेच  प्राथमिक शिक्षक यांच्या 29 पथकाने केली  यामध्ये गावातील नागरिकांनी सहकार्य केले गावात आजपर्यंत 72 पेशन्ट कोरोना पोजिटीव्ह होते त्यातील  42 जण उपचार घेत आहेत व बाकीचे रुग्ण बरे होऊन परत घरी आलेत पाच मयत झाली आहे

सर्वेक्षण मध्ये 141लोक संशयित आढलेने त्यांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात आली यामध्ये 38 जण पोजिटीव्ह आलेत यात भिगवण मधील 15,पिंपळे 5,भादलवाडी 8,मदनवाडी  2, डाळज न 2  चा 1,बिल्ट कम्पनी  4,म्हसोबावाडी 1,अकोले चा  1आहे

आज या अभियानात जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर, सरपंच अनिता संतोष धवडे,उपसभापती संजय देहाडे,तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलीस निरीक्षक जिवन माने , गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, विस्तार अधिकारी बगाडे,सचिन बोगावत, अजिंक्य माडगे, मनोज राक्षे, दत्तात्रय पाचांगणे,आण्णासाहेब धवडे,विस्तार अधिकारी दिलीप जगताप, तलाठी गाडेकर , ग्रामसेवक सागर परदेशी,  , आरोग्य विभागाचे डॉक्टर कैलास व्यवहारे, समुदाय आरोग्य अधिकारी हेमंत गावित, मृदुला जगताप भगत, किर्ती व्यवहारे, लॅब चे सुनीता पाळंदे, सौदागर शिंदे,अशोक मोरे  उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News