सोयाबीन बियाणे उत्पादनाचे सोपे तंत्रज्ञान !! बांधावरची शेतीशाळा


सोयाबीन बियाणे उत्पादनाचे सोपे तंत्रज्ञान !! बांधावरची शेतीशाळा

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

                 🌻बांधावरची शेतीशाळा🌻

नमस्कार मित्रांनो, आजच्या शेतीशाळा सदरात आपण सोयाबिन बियाणे उत्पादनाचे सोपे तंत्रज्ञानाबद्दल माहीती घेणार आहोत.

सोयाबीन सरळ वाणअसल्यामुळे दरवर्षी बियाणे बॅग घ्यायची आवश्यकता नाही. यावर्षी पेरलेल्या सोयाबीन मधूनच पुढच्या वर्षी बियाणे ठेवता येइल.साधारण 1 हेक्टर करीता 1 क्विंटल बियाणे ठेवावे.शेतातील प्लॉट निवडताना 3 मीटर विलगीकरण अंतर ठेवावे पुढच्या वर्षी पेरणी क्षेत्राच्या हिशोबाने 5 ते 10 गुंठे क्षेत्र बियाणे करिता निश्चित करावे.

निवडलेल्या क्षेत्रातील जास्त उंचीची झाडे व मुख्य वानापेक्षा वेगळी दिसनारी झाडे उपटून टाकावीत.

निवडलेल्या क्षेत्रावर बुरशीनाशकांची tebukonizol10℅+ सल्फर  65% या संयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी.

सोयाबीन पीक दाण्यात पूर्ण परिपक्व झाल्यावर 17% पेक्षा कमी आर्द्रता असताना काढणी करावी.

मळणी करताना मळनी यंत्राचे फेरे 350 ते 400 ठेवावे त्यामुळे दाण्यास कमी इजा पोचेल शक्य असल्यास बियाणे ठेवावयाचे सोयबिनची मळणी मजुरांच्या सहाय्याने करावी

मळणी केल्यानंतर सोयाबीन ताडपत्री वर सावलीमध्ये 2 - 3 दिवस बियाण्यामध्ये आर्द्रता 10 ते 12 % होइपर्यंत चांगले वाळवून घ्यावे.

सोयाबीन बियाणे साठवण करताना ज्युट च्या पोत्यात (बारदाना) 50 ते 60 किलो प्रत्येकी एवढेच भरून घ्यावी 

बियाणे थप्पी 7 फुटापेक्षा उंच नसू नये व जमिनीच्या वर लाकडी फळीवर ठेवावी.साठवणूकीनंतर व वाहतूक करताना आदळआपट होऊ देऊ नये पेरणी करतांना 75 ते 100 मिलिलीटर पाऊस झाल्यावर रासायनिक बुरशीनाशकांची कार्बोकझिन 37.5℅+थायरम 37.5℅ 3 ग्राम प्रतिकिलो प्रमाणे  व जिवाणू संवर्धन रायझोबियम पी एस बी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

सहकार्य -निलेश बिबवे कृषी सहाय्यक .

तालुका कृषी विभाग कोपरगाव.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News