माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम!! राहाता तालुक्यातील ग्राम पंचायतींकडून वैद्यकीय साहित्याची मदत!! नागरिकांचा उत्तम प्रतिसाद


माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम!! राहाता तालुक्यातील ग्राम पंचायतींकडून वैद्यकीय साहित्याची मदत!! नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी: 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या व तांडे येथील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोर्माबीड आजार असल्यास उपचार आणि आरोग्य विभागातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या पथकाकडून प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. 

या उपक्रमांतर्गत राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांनी या मोहिमेला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचे तसेच सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. पथकांमधील सदस्यांकडून नागरिक आरोग्य तपासणी करुन घेत आहेत.

            तालुक्यातील वाकडी, कोल्हार बुद्रुक आणि पुणतांबा परिसरातील ग्राम पंचायतींनी वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक ग्लोव्हज, इन्फ्रारेड थर्मामिटर, पल्स ऑक्सीमिटर, सॅनिटायझर इत्यादी साहित्याचा पथकाला पुरवठा केला.

            कोविड आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी  राज्यात 15 सप्टेंबर,2020 पासून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिम राबविण्यास सुरुवात झाली असून मोहीमेची पहिली फेरी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये  आणि दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पार पडणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा आहे. तालुका प्रशासनातील आरोग्य विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय व अन्य कार्यालयांच्या  सहकार्याने ही मोहिम पार पाडण्यात येत आहे. ग्राम पंचायतींचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्राम स्तरावरील कोरोना सुरक्षा समिती सदस्यांकडून नागरिकांनी या मोहिमेत वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.जाहिरात
Search
विडिओ
Recent News