वाकी व चोपडज पुलांची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी, पुलावरून वाहतेय मोठया प्रमाणात पाणी


वाकी व चोपडज पुलांची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी, पुलावरून वाहतेय मोठया प्रमाणात पाणी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील वाकी याठिकाणी असणारा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून मोठया प्रमाणात पाणी वहात आहे. त्यामुळे वाकी, चोपडज येथे ओढ्यावर असणाऱ्या पुलावरून पाणी जास्त प्रमाणात वाहू लागल्याने पावसाळ्यात अनेकदा वाहतूक बंद होते कारण या पुलांची उंची कमी आहे. वाकी व चोपडज पुलांची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी वाकी, चोपडज, पांढरवस्ती येथील ग्रामस्थांनी केली आहे.

    वाकी व चोपडज ओढ्यावरील बंधारा जोरदार पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. चोपडज पुलाला मध्ये तीन फुटापर्यंत खोल खड्डे पडले असून त्यात चारचाकी व दुचाकी वहाने पडून अपघात होत आहेत. तसेच रस्त्याची अवस्था ही खूप वाईट झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता व साईडपट्टया  खचल्या आहेत.यातून एखादी मोठी दुर्घटनाही घडू शकते त्याआधी या वाकी चोपडज रस्त्याचे काम व्हावे व पुलांची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News